अरे व्वा, बैलगाडीतून निघाली वरात

The wedding party started from the bullock cart

नांदेड : लग्नाच्या बोहल्यावरून वरातीला सारे बाराती निघतात आणि समोर पाहतात तर वरातीसाठी सजलेली बैलगाडी. राजेशाही थाटात सजवलेल्या या बैलगाडीत नवरा नवरी बसतात, वरात निघते… एसी गाड्यांच्या जमान्यात काहीतरी वेगळे पहायला मिळाल्याने वरातीत आलेल्या नातेवाईकांनी सेल्फीसाठी गर्दी केली होती.

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील एमशेटवाडी ते बारसगाव असा प्रवास नवरदेव, नववधू आणि संपूर्ण वऱ्हाडाने बैलगाडीतून केला आहे. नवरदेव सुशिल आणि नववधू शिवकन्या यांनी बुलेट, ट्रॅक्टर, हेलिकॉप्टरची अपेक्षा न ठेवता बैलगाडीला आपलंसं केलं आहे, यामुळे लग्नाच्या खर्चामध्ये घटही झाली आणि पारंपारिक संस्कृतीचा ठेवा जतनही करण्यात आले.

लग्नसोहळ्यात वऱ्हाडी पाहुण्यांची वाहने, वाजंत्री अशा अवास्तव खर्चाला फाटा देत येथील शेतकरी असलेल्या बोरसे आणि भालेराव जिल्ह्यातील बारसदाव येथील सुशील बोरसे आणि शिवकन्या भालेराव या दोघांचा विवाह नुकताच पार पडला. भालेराव कुटुंबीयांनी वधू-वरांना मंडपातून बैलगाडीत बसून बिदाई केली. त्यामुळे यानिमित्ताने अनेक जुन्या जाणकारांना पारंपरिक विवाहाची अनुभूती कित्येक वर्षांनंतर आली. लग्नसोहळा थाटात पार पडला. या बैलांना पोळ्याच्या दिवशी सजविले जाते त्याप्रमाणे विविध रंगीतसंगीत फुलांच्या माळांनी बैलगाडी सजविण्यात आली होती. बैलगाडीवर नववधू-वरास बसण्यासाठी आसन ठेवण्यात आले होते.

हे देखील वाचा :

Exit mobile version