हजारो हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यात

farmer-tesion

जळगाव : सिंचनासाठी वीजपुरवठा सुरळीत नाही, तसेच महावितरणकडून शेतकऱ्याची वीज कापली जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पीकसुद्धा काही दिवसांत काढणीला येईल. पण याच संधीचा फायदा घेत वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दुसरा हप्ता भरण्यासाठी तगादा लावला आहे व शेतकऱ्यांची वीज तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

हातातोंडाशी आलेला घास जाणार तर नाही, अशी भीती शेतकऱ्यांमधे निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पीक वाळू नये म्हणून शेतकरी वीज वितरण कार्यालयात विनवणी करताना दिसत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, बोंड अळी, वाघाची दहशत या दुष्टचक्रात पोशिंदा अडकला आहे. 

या वर्षी खरिपाची पिके समाधानकारक दिसत होती. पण अती पावसामुळे व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिराऊन गेला आहे. खरिपाच्या हंगामात झालेली तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले लक्ष रब्बी हंगामाकडे केंद्रित केले आहे. मात्र याही ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करावा व वीज कापू नये, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

हे देखील वाचा :

Exit mobile version