तीनशे एकरातील ऊसाचा झाला कोळसा

three-hundred-acres-of-sugarcane-burned

सांगली : महापूर आणि अतिवृष्टी या संकटांवर मात करीत्या असतांनाच शेतकऱ्यांना आता नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. सांगली ता. मिरज येथील उसाला मंगळवारी आग लागली. त्यामध्ये तीनशे एकरांवरील ऊस जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आगीचे लोट भयानक असल्याने, अपयश आले.

वारणा नदीकाठावर असलेल्या दूधगावमध्ये उसाचे मोठे क्षेत्र आहे. सध्या उसापचा हंगाम मध्यावधीत आला आहे. फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही आडसाली लागणही शेतात उस असल्याने शेतकऱयांची डोकेदुखी वाढली आहे. डिग्रस वाट, दूधगाव – कवठेपिरान रोडवरील आोढ्यापासून गणपती मंदिराजवळ कवठेपिरान हद्दी पर्यंतच्या उसाला आग लागली.

यापूर्वी शेतकऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून विजेच्या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा बंदोवस्त करावा, सदर डीपी दुरुस्तीची विनंती केली होती. परंतु, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. महावितरणने शेतकऱ्यांच्या विनंतीची दखल घेवून त्या अनुषंगाने शेतातील लोंबणा-या ताराची व डीपीची दुरुस्ती केली असती तर ऊस आग लागली नसती अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

भरपाईची मागणी

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी महावितरणच्या वाकडे पोल, लोंबत्या तारा, उघडे डीपी हे चित्र पहायला मिळत आहे. महावितरणचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची दखल न घेणा-या महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तर सध्या जळून खाक झालेल्या शेतकऱ्याचे ऊस पिकाचे नुकसान भरपाई महावितरणने द्यावी अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version