क्विंटलमागे तीनशे ग्रॅम धान्य कपात; वाचा काय आहे प्रकरण

dhanya

अकोट : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची मोजणी करताना वजनकाट्यावरील क्विंटलमागे तीनशे ग्रॅम धान्य कपातीच्या मुद्द्यावरून बाजार समिती मंगळवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी दिली.

यार्डवरील नेहमीच्या वजनकाट्यावर लवकर मोजमाप होते. या वजनकाट्यावर प्रती क्विटल मागे ३०० ग्रॅम धान्याची कपात करू नये, हा निर्णय शेतकरी हिताचा आहे. परंतु, व्यापारी या काट्यावर मोजमाप न करता इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर मोजमाप करीत असल्याने शेतमाल मोजणीला उशीर होत आहे. त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय शेतकरी हितासाठी घेण्यात आल्याचे बाजार समिती सदस्यांनी सांगीतले.

अकोट बाजार समितीमध्ये शेतकरी शेतमाल विक्रीकरिता आणतात. यार्डवर धान्य मोजमाप करताना व्यापारी प्रती क्विंटल मागे ३०० ग्रॅम धान्याची कपात करण्यात येते. त्यामुळे ही कपात करण्यात येऊ नये, असे पत्र जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांनी दिले. त्यानुसार बाजार समिती सचिव जायले यांनी अकोट बाजार समितीने सर्व व्यापारी व परवानाधारक यांना शेतकऱ्यांनी विना बारदाना धान्य विक्रीकरिता आणले असता शेतमालावर मोजमाप करताना शेतकऱ्यांचे पट्टीमधून ३०० ग्रॅम धान्याची कपात करू नये, असे कळविले. दरम्यान, व्यापारी यांनी ३०० ग्रॅम कपात करणारे वजनकाट्यावर मोजमाप न करता बाजार समितीकडे वजन काटे उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

बाजार समितीने काटे उपलब्ध करून दिले, मात्र या वजनकाट्यावर मोजमाप करण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोजमाप न झाल्यास वाहनभाड्याचा आर्थिक भदंड बस नये म्हणन चिंताग्रस्त आहे. तर मुख्य प्रशासक पुंडकर यांनी यार्डवरील पूर्वीच्या मोठ्या काट्यावर शेतमाल घ्यावा, अशी भूमिका घेतली आहे. परंतु, या वजनकाट्यावर मोजमाप करण्यास व्यापारी तयार नसल्याचे सांगत बाजारपेठ बंद ठेवण्यात येत असल्याचे निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version