हळदीला ११ हजार रुपयांचा उच्चांकी भाव; जाणून घ्या कुठे?

Turmeric

हिंगोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षी हळदीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता असले तरी यंदा हळदीला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सांगली जिल्ह्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

हळदीची बाजार पेठ सांगलीची प्रसिद्ध आहे. येथे ८ हजार रुपयांच्या दराच्या जवळपास भाव मिळत आहे. सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर मिळत आहे. हिंगोलीच्या मार्केट यार्डात ७८०० ते सव्वा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव मिळाल्यानंतर वसमत बाजार समितीमध्ये उच्चांकी ११ हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

हिंगोली बाजार समितीनंतर वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीच्या बाजारपेठेसाठी राज्यात ओळखली जाते. मराठवाड्यासह विदर्भातून यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातून हिंगोलीच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात हळद विक्रीला येते. कोरोनाकाळात इम्यूनिटी वाढविण्यासाठी हळदीचा वापर वाढला आहे. भारतासह परदेशातही हळदीचे महत्व आता पटले आहे. यामुळे हळदीला मागणी वाढत आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version