उन्हाळ्यात टरबूज-खरबूजची लागवड करतायेत, मग हे वाचाच

Watermelon

पुणे : पश्चिम महराष्ट्रासह मराठवाड्यात टरबूज आणि खरबूजाचेही क्षेत्र वाढत आहे. मात्र, योग्य नियोजन आणि लागवड करताना योग्य वाणांची निवड हेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेले वाण तसेच एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. देवराव देसरकर यांनी दिला आहे.

टरबूज-खरबूज हे हंगामी पीक असून याच्या लागवडीसाठी मध्यम, काळी व पाण्याचा योग्य निचरा होणारी शेत जमिन निवडणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी एकाच जागी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय १५ फेब्रुवारीपर्यंत याची लागवड करता येते. मात्र, लागवड करण्यापूर्वी सर्वात महत्वाचे बियाणे १२ तास पाण्यात भिजवून लागवड करावी.

टरबूजाची लागवड करताना अर्का माणिक, दुर्गापूर केशर, पुसा बेदाणा, शुगर बेबी, अर्का मधू या वाणांची तर खरबूजासाठी अर्का राजन, काशी मधू, हरा, अर्का जीत, पूसा मधू या वाणांची निवड केल्यास अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. जोपासना करताना एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड व्यवस्थापन पध्दत ही महत्वाची आहे. उन्हाळी हंगामात किडीचा प्रादुर्भाव कमी असला तरी योग्य वेळी पाणी आणि मशागत यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. हे गणितच लक्षात ठेऊन शेतकर्‍यांनी कमी कालावधीमधील या पिकांतून अधिकचे उत्पन्न घेणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा :

Exit mobile version