रात्री पिकांना पाणी देतांना समोर आला बिबट्या; जाणून घ्या काय झाले शेतकऱ्यांचे

Leopard

अहमदनगर : शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा यासाठी राज्यभरातील शेतकर्‍यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी यासाठी आंदोलने देखील सुरु आहेत. शेतात दिवसाऐवजी रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकर्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकर्‍याच्या दिशेने एक बिबट्या आला मात्र शेतकर्‍याने दाखविलेल्या धाडसामुळे त्याचे प्राण वाचले.

दिवसा वीज नसल्याने अनेक भागांत शेतकर्‍यांना रात्री शेतात जावे लागते. ही अवघ्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची व्यथा आहे. असाच काहीसा प्रकार सोनेवाडी येथे भिकाजी बोंडखळ व दिनकर बोंडखळ यांच्या सोबत घडला. ते शेतात पिकांना पाणी देत होते. त्यावेळी व्यंकट बोंडखळ यांना एक बिबट्या त्यांच्या दिशेने चाल करून येत असल्याचे दिसले. त्यांच्या हातात केवळ बॅटरी होती.

बोंडखळ यांनी घाबरुन न जाता प्रसंगावधान राखत बॅटरीचा फोकस बिबट्याच्या डोळ्यावर मारला. त्यामुळे बिबट्या थबकला. तोपर्यंत त्यांनी इतर शेतकर्‍यांना मोठमोठ्याने हाका मारल्या. त्यामुळे शेजारील शेतात काम करीत असलेले शेतकरीही सावध झाले व त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. झालेल्या या प्रकारामुळे बिबट्याने गोधळून धूम ठोकली.

हे देखील वाचा :

Exit mobile version