ड्रोनच्या मदतीने किटकनाशक फवारणी का ठरतेय निष्प्रभ; हे आहे मुख्य कारण

drone-indian-farm

The Hindu Business Line

मुंबई : कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढविण्यासाठी केंदापाठोपाठ राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ड्रोन वापराचे धडे दिले जात आहेत. मात्र यात शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढवायचा असेल तर ड्रोन वापर व तंत्रज्ञानात मोठे बदल करावे लागणार आहेत.

आतापर्यंत आलेल्या अनुभवावरुन ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या वनस्पतींवर कीटकनाशकांची फवारणी ही निष्प्रभ ठरत आहे. ड्रोनद्वारे फार कमी प्रमाणात किटकनाशकांची फवारणी होत असल्याने मोठ्या वनस्पती त्याचा फारसा परिणाम होत नाही. वनस्पतीच्या मुळापर्यंत या माध्यमातून केलेल्या फवारणीचा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत पानांच्या मागील बाजूस व खोडात जर एक प्रकारचा किडा असेल तर ड्रोनमधून किटकनाशकाच्या फवारणीमुळे त्याचा नायनाट होईल असे नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करुनही शेतकर्‍यांना पुन्हा हाताने फवारणी करावी लागत आहे.

कीटकनाशक फवारणीसाठी शेतकरी २०० लिटर टँकचा उपाय करतात. जेव्हा कीटकनाशक चांगले विरघळते आणि जेव्हा ते यंत्रांद्वारे विभागले जाते तेव्हा योग्य दाबाने ते वनस्पतींमध्ये तसेच मातीच्या आत सहज जाते. चाचणीदरम्यान ड्रोनच्या १० लिटरच्या टाकीवर हे सोल्यूशन टाकण्यात आलं होतं, मात्र ड्रोनने उडताना योग्य दाब नसल्यामुळे बरीच कीटकनाशकं हवेत उडून गेली. ड्रोनचा शेती व्यवसयात वापर वाढल्याने शेतकर्‍यांच्या परीश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे. मात्र, ड्रोनचा वापर करताना काय काळजी घ्यावी लागणार आहे याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :

Exit mobile version