अर्थसंकल्पात शेती व शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांविरोधात सुमारे वर्षभर चाललेल्या आंदोलनमुळे मोदी सरकारची शेतकरी विरोधी प्रतिमा निर्माण झाली होती. यामुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती व शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. ती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी खरी ठरवत अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यावर केंद्र सरकारचा भर

सेंद्रीय शेती क्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून देशाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जात आहे. सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून याची जबाबदारी ही देशभरातील कृषी महाविद्यालयावर राहणार आहे. त्यामुळे थेट शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती पध्दतीची माहिती होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदीय अर्थसंकल्पात सांगितले आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीची जबाबदारी ही आता कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालयालवर राहणार आहे.

शेतकर्‍यांसाठी केलेल्या ठळक घोषणा

Exit mobile version