सेंद्रिय शेती करणाऱ्यांना धरती मित्र पुरस्कार

dharati-mitra-award

पुणे : ऑरगॅनिक इंडिया या कंपनीतर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (DFIFF)देशातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘धरती मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  

ऑरगॅनिक इंडियाकडून रसायनमुक्त शेतीसोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्यरत शेतकऱ्यांना ‘धरती मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २०१७ सालापासून हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

धरती मित्र पुरस्काराच्या माध्यमातून देशभरात सेंद्रिय शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आपलया उपक्रमांची माहिती सर्वत्र पोहचवण्यासाठी एक मोठी संधीही उपलब्ध होत असते.  २०१७ साली ‘धरती मित्र’ पुरस्कार मिळवणारे भारत भूषण त्यागी यांना  २०१९ साली भारत सरकारकडून पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 

देशभरात सेंद्रिय शेती क्षेत्रात नवनव्या संकल्पनांचा अविष्कार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल म्हणून धरती मित्र  पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारांच्या निमीत्ताने देशभरात सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी सक्रिय शेतकऱ्यांच्या यशोगाथा सर्वांसमोर येतील. यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्याची आवड निर्माण होईल, असा विश्वास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सल्लागार डॉ. अशोक यादव यांनी व्यक्त केला आहे.    

हे देखील वाचा :

Exit mobile version