नैसर्गिक शेती करण्याचा विचार करताय; मग हे वाचाच…

पुणे : उत्पादन वाढीच्या प्रयत्नांमध्ये ना शेत जमिनीचे आरोग्य जोपासले गेले आहे ना देशातील नागरिकांचे. त्यामुळे आता हीच योग्य वेळ आहे नैसर्गिक शेती करण्याची. आता पर्यंत या पर्यांयाचा अवलंब कोणी केलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी Organic Farming केवळ देशातच बाजारपेठ आहे असे नाही तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. गरज आहे ती शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्याची. रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे. असाच रासायनिक खतांचा वापर होत राहिला तर मात्र, शेती व्यवसयाचे मोठे नुकसान होणार आहे.

देशात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच कृषी क्षेत्रातही डिजिटायझेशनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे उद्दिष्ट यंदाच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. सर्वसमावेशक विकासाचा एक भाग म्हणून, सरकार पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी किसान ड्रोन वापरण्यास प्रोत्साहन देणार आहे. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून हे उपक्रम राबवण्यात येतील, जेणेकरून शेतकऱ्यांना डिजिटल आणि उच्च दर्जाच्या सेवा देता येतील. सर्वसमावेशक विकास हे सरकारच्या चार प्राधान्यांपैकी एक आहे.

हे देखील वाचा : खंड शेतीची यशोगाथा : ७ एकरवाल्याने केली १८० एकर शेती

कृषी स्टार्टअप आणि ग्रामीण उपक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी सरकार नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्टार्टअप्सच्या उपक्रमांमध्ये शेतकरी, उत्पादक संस्था (एफपीओ) साठी बळ, शेतकऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर यंत्रसामग्री आणि त्यासाठी तंत्रज्ञानही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी शेतकऱ्यांना डिजिटल आणि उच्च तंत्रज्ञान सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन आणि विस्तार संस्थांसह खासगी अ‍ॅग्रीटेक संस्थांची मदत घेण्यात येईल.

कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा

नैसर्गिक शून्य बजेट आणि सेंद्रिय शेती, आधुनिक काळातील शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापन या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे. रसायनमुक्त शेतीचा प्रारंभ गंगा नदी परिसरात संपूर्ण देशभरात रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या पाच किलोमीटरच्या कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर ही योजना राबविली जात आहे.

कमी खर्चात अधिकचे उत्पादन

नैसर्गिक शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. हा नैसर्गिक शेतीचा बदल काही दिवसांमध्ये होणार नाही. शिवाय शेतकऱ्यांना भीती आहे की, यामधून उत्पादनात घट होईल याची, मात्र, अल्पभुधारक शेतकऱ्यांनी लागलीच सर्वच क्षेत्रावर हा प्रयोग न करता टप्प्याटप्प्याने हा बदल करणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर आणि किटकनाशकांवर अधिकचा खर्चही करावा लागणार नाही. मात्र, हा बदल स्विकारणे ही आता काळाची गरज झाली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी बदल स्वीकारलेला आहे. हाच बदल करुन अल्पभुधारक शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.

रासायनिक खतांमुळे दुहेरी नुकसान

केवळ उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. मात्र, रासायनिक खतांच्या वापराची गरजच मुळात चुकीच्या शेती पध्दतीमुळे शेतकऱ्यांवर आली आहे. आता मुळाशी जाऊन याचा अभ्यास करण्याची गरज आहे. उत्पादनावाढीसाठी खतांचा वापर आणि किटनाशकांच्या फवारणीसाठी पुन्हा औषधांचा वापर यामध्येच शेतजमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिकचे उत्पादन घेण्यासाठी ‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय आहे.

Exit mobile version