पुणे : भारतात केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये वेलचीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कारण ते वर्षभरात १५००-४००० मिमी पाऊस पडतो. मात्र महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील काही प्रगतीशिल शेतकर्यांनी नवनवीन तंत्रांचा वापर करत वेलचीची यशस्वीरित्या लागवड करुन दाखविली आहे. यातून ते लाखों रुपयांची कमाई देखील करत आहेत.
वेलचीची पिके १०-३५ डिग्री सेल्सिअस तापमानात चांगली वाढतात. लागवडीसाठी काळी चिकणमाती उत्तम मानली जाते. तसेच पाण्याचा चांगला निचरा असलेल्या काळ्या जमिनीवरही याची लागवड करता येते. शेतात वेलची रोपे लावण्यापूर्वी ती रोपवाटिकेत तयार केली जाते. एक हेक्टरमध्ये रोपवाटिका तयार करण्यासाठी एक किलो वेलची बियाणे पुरेसे आहे.
रोपे लावल्यानंतर दोन वर्षांनी फळ देण्यास सुरुवात होते. या पिकाची योग्य निगा राखली तर हेक्टरी १४० ते १५० किलो वेलचीचे उत्पादन मिळू शकतो. बाजारात वेलचीची किंमत ११०० ते २००० हजार रुपये प्रतिकिलो आहे. अशा स्थितीत शेतकर्याला एका हेक्टरमध्ये वार्षिक ३ लाखांपर्यंतचा नफा सहज मिळू शकतो.