पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या १० लाख ५९ हजार शेतकर्यांना ८३६ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकर्यांपैकी ४९७४ शेतकर्यांच्या खात्यावर २.६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येते. देशात राबविण्यात येणार्या पीकविमा योजनेत महाराष्ट्राचा सहभाग साधारणत: २० टक्केपर्यंत असतो. राज्यात सातबारा ऑनलाइन झाल्यामुळे ही योजनेची अंमलबजावणी वेगाने आणि पारदर्शी पद्धतीने करण्यात यश आले. ऑनलाइन सातबाराबरोबर पीकविमा संकेतस्थळ संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांचा वेळ, पैसा आणि श्रमाची बचत झाली आहे. यापूर्वी सातबारा, आठ अ चुकीच्या पद्धतीने जोडले जायचे. क्षेत्र कमी असूनही जास्त क्षेत्रावर विमा काढला जायचा. चुकीच्या पद्धतीने अनुदान घेतले जायचे. या सर्व प्रकाराला आळा बसला आहे. त्यामुळे आता योग्य, पात्र शेतकर्याला विमा संरक्षणाचा लाभ मिळतो आहे.