जाणून घ्या : नॅनो खत तंत्रज्ञान फायदयाचे की तोट्याचे?

- Advertisement -

पुणे : सायनिक खत व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा ‘इफ्को’ने गतवर्षी शोध लावला आहे. ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेल्या यशस्वी चाचण्यानंतर याच वर्षापासून ‘नॅनो’च्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात झाली आहे. अर्धा लिटर नॅनो युरियाची किंमत २४० रुपये ठेवण्यात आली आहे.

गुजरातमध्ये इफ्को जैव नॅनो तंत्रज्ञान संशोधन केंद्र स्थापण्यात आले आहे. तेथील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमानंतर जगातील पहिला द्रवरूप नॅनो युरिया तयार केला आहे. देशातील इतर भागांत व महाराष्ट्रात देखील या युरियाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. युरिया वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे होणारे फायदे अभूतपूर्व स्वरूपाचे असतील असा दावा कंपनीने केला आहे.

दाणेदार युरियाला पर्याय

शेतकरी सध्या दाणेदार खताचा भरमसाट वापर काही भागांत करतात. मात्र दाणेदार युरिया मोठ्या प्रमाणात वाया जातो. त्यातून पर्यावरणाला मोठी हानी पोहोचते. दाणेदार युरियाला पर्याय म्हणून इफ्कोने नॅनो युरिया आणला. शास्त्रज्ञांनी अर्धा लिटर नॅनो युरियात ४० हजार पीपीएम इतके नायट्रोजन टाकले आहे. यामुळे ५० किलो गोणीतील दाणेदार युरिया इतके नत्र पिकाला मिळेल. शिवाय, दाणेदार युरियापेक्षा १० टक्क्यांनी नॅनो युरिया स्वस्त आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने झाल्यास देशातील पारंपरिक युरियाचा वापर ५० टक्क्यांनी घटू शकतो.

शेतकऱ्यांना किफायतशीर पर्याय उपलब्ध

अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. या काळात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो यूरिया उपलब्ध झाल्यानं वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील नॅनो यूरियाचा वापर फायेदशीर ठरेल.

नॅनो युरियाची 94 पिकांवर चाचणी

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिंकावर चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांच्या 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

नॅनो यूरियाचा फायदा काय?

नॅनो यूरियाची निर्मिती आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती या अंतर्गत करण्यात आली आहे. इफको नॅनो यूरिया पिकांवर प्रभावी ठरला आहे. नॅनो यूरिया जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील फायदा होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचा प्रभावी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यासा देखील मदत होणार आहे.

नॅनो यूरियाची किंमत काय?

नॅनो यूरिया हा स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना मंगळवार पासून उपलब्ध होईल. नॅनो यूरियाची 500 मिली बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नॉनो युरियाच्या फायदा

हा युरिया सामान्य युरिया पेक्षा कितीतरी तसेच सामान्य युरियाला चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. नॅनो युरिया 500 मिली मध्ये 40 हजार नायट्रोजन असतो. तसेच या नॅनो युरिया यामुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. हे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे.

 • सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त.
 • पिकावर परिणाम न करता इतर नत्राची युरिया वाचवते.
 • पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या समस्येपासून मुक्तता, म्हणजेच, माती, हवा आणि पाण्याची गुणवत्ता सुधारणेबरोबरच त्याच्या खतांच्या वापराची कार्यक्षमता देखील जास्त आहे.
 • उत्पादनातील वाढीसह उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होते.
 • वाहतूक आणि साठवण खर्च कमी करता येतो आणि सोयीस्कर वाहतूक करता येते.

लिक्विड नॅनो यूरिया वापरण्याची पद्धत

 • लिक्विड नॅनो यूरियाची प्रती लिटर पाण्यात 2 ते 4 मिली द्रावणाची फवारणी पिकावर करावी.
 • नॅनो यूरिया कमी नत्र आवश्यक असणार्‍या पिकांमध्ये 2 लिटर पाण्यात प्रति लिटर दराने आणि जास्त नायट्रोजन आवश्यक असलेल्या पिकांमध्ये 4 मिली पर्यंत वापरता येतो.
 • नॅनो यूरिया धान्य, तेल, भाजीपाला, कापूस इत्यादी पिकांमध्ये दोनदा आणि एकदा डाळीच्या पिकांमध्ये वापरला जाऊ शकतो.
 • एक एकर शेतासाठी प्रति फवारणीसाठी सुमारे 150 लीटर पाणी पुरेसे आहे.

दिशानिर्देश आणि वापरासाठी खबरदारी

 • वापरण्यापूर्वी बाटली चांगली हलवा.
 • प्लेट फॅन नोजल वापरा.
 • सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. जोरदार सूर्यप्रकाश, जोरदार वारा आणि अधिक दव असताना हे वापरु नये.
 • नॅनो यूरिया फवारणीच्या 12 तासाच्या आत पाऊस पडल्यास फवारणी पुन्हा करा.
 • सागरिका सारख्या जैव-उत्प्रेरकांचा वापर 100% विद्रव्य खते आणि कृषी रसायनांच्या संयोजनात केला जाऊ शकतो. परंतु चाचणी केल्यानंतरच वापरा.
 • चांगल्या परिणामासाठी, नॅनो यूरियाचा उत्पादन त्याच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत वापरावा.
 • नॅनो यूरिया विष मुक्त आहे, तथापि, सुरक्षिततेसाठी पीक फवारणी करताना फेस मास्क आणि ग्लोव्ह्ज वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 • नॅनो यूरिया मुलांना आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर थंड आणि कोरड्या जागी साठवा.

हे देखील वाचा