राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

- Advertisement -

शेतशिवार । पुणे : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने १८ नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी सर्व शैक्षणिक कार्यक्रमाचा खोळंबा झाला होता. लॉकडाऊनसह इतर निर्बंधनांमुळे २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया लांबल्या होत्या. एमएचटी-सीईटीनिकालानंतर कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही जाहीर करण्यात आली आहे. यात राज्यात १९१ महाविद्यालयांमधील १५ हजार ३३७ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना https://ug.agriadmissions.in या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्यातील कृषी महाविद्यालये

विद्यापीठमहाविद्यालयांची संख्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी७३
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला३७
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी५४
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली२७

राज्यातील कृषी महाविद्यालयांची सद्याची स्थिती

पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालये : १९१

एकूण पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता : १५,३३७

शासकीय महाविद्यालयांची संख्या : ३७

अनुदानित महाविद्यालयांची संख्या : २

विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या : १५२

हे देखील वाचा