• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

भन्नाट: विदर्भात सफरचंदाची शेती त्यात कांद्याचे पिक

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in बातम्या
February 16, 2022 | 3:04 pm
apple cultivation in vidarbha with onion crop

अकोला : देऊळगाव ता. पाथुर येथील कष्टकरी शेतकरी संतोष नारायण वानखेडे यांनी आपल्या शेतात चक्क सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे. विशेष बाब म्हणजे वानखेडे सफरचंदाची शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करत आहेत. देऊळगावचे शेतकरी संतोष वानखेडे यांनी 20 गुंठे क्षेत्रात सफरचंदाची 550 रोपे लावली आहेत. अकोला जिल्ह्यासारख्या उष्ण हवामानात हा धाडसी प्रयोग आहे.

वानखेडे गेली पाच वर्षे सेद्रिय शेती करत होते. त्यामुळे त्यांनी याच पद्धतीने सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या 12,000 रुपये शेकडा या दराने आणलेले सफरचंदाच्या रोपट्याशिवाय कोणतेही भांडवल खर्च करावे लागत नाही. या पिकांसाठी आवश्यक कीटकनाशके, घन जीवामृत, मिनरल तत्त्व, सूक्ष्म अन्नद्रव्ये, शेणाचे द्रावण इ. सर्व जिन्नस स्वतः बनवतात आणि वापरतात.

सफरचंद हिमाचल प्रदेश किंवा जम्मू-काश्मीरप्रमाणे थंड हवामानातील फळ म्हणून ओळखले जाते. मात्र, या गृहितकांना छेद देत 22 जानेवारी 2021 रोजी वानखेडे यांनी त्यांच्या शेतात ही रोपे आणण्यात आली व लावली. आज त्या रोपांची अवस्था अत्यंत चांगली आहे. त्यांनी त्यांच्या शेतात एचआरएम 99, अण्णा, डोअरशेड गोल्डन या तीन जाती लावल्या आहेत. ही झाडे 48 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानात तग धरू शकतात. त्याच्यासाठी या जातींची निवड केली आहे असे त्यांनी सांगितले.

गेल्या आरशात एवढ्या कडक उन्हाळ्यात रोपे जगली. सध्या ही झाडे चांगली विकसित झाली आहेत आणि 6 ते 8 फूट उंच आहेत. काही झाडांना फुलेही आली आहेत. तथापि, रोपे पूर्ण वाढल्यानंतर तीन वर्षांनी त्यांना सफरचंदांचा पहिला हंगाम घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी आता कापणी सुरू केली आहे.सध्या महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, अहमदनगर येथे काही शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केली आहे. ते संतोष वानखेडे यांच्या संपर्कात आहे. तेथून त्यांचा संपर्क हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादक पूरणसिंग बुनकर रा. दुर्गाला ता. शहापूर जि. कांगाडा यांच्याशी झाला. त्याच्या मोबाईलवरून आणि यूट्यूबच्या माध्यमातून विविध प्रयोगांची माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या शेतात सफरचंद लावायचे ठरवले.

सफरचंदाचे रोप परिपक्व झाल्यावर (तीन वर्षानंतर) जानेवारी ते फेब्रुवारी या काळात त्याला फुलधारणा होते. त्यानंतर फलधारणा होऊन मे पर्यंत फळे पक्व होऊ लागतात. प्रत्यक्ष मे मध्ये फळे काढणीला सुरुवात होते. एका झाडापासून २० किलो फळांचे उत्पादन मिळू शकते, असेही वानखडे यांनी सांगितले. सद्यस्थितीत सफरचंदाच्या रोपांच्या दोन ओळीत ते आंतरपिक घेत आहेत. त्यात त्यांनी खरीप हंगामात कांदा तर रब्बी हंगामात हरभरा लागवड केली आहे. ही पिकेही ते जैविक पद्धतीनेच घेतात.

Tags: Apple FarmingOninon CropVidharba
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

money farmer

मल्टी लेयर फार्मिंग तंत्रातून शेतकरी कमवू शकतात ३ ते ४ पट नफा; जाणून घ्या सविस्तर

August 9, 2022 | 5:00 pm
farmer 1 1

शेतातील मातीची सुपिकता वाढविण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला; तुम्हीही अवलंब करा होईल मोठा फायदा

August 9, 2022 | 4:25 pm
pik vima

पीकविमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या तब्बल ८ लाखांनी वाढली, हे आहे कारण

August 9, 2022 | 2:29 pm
shinde farmer

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मुख्यमंत्री शिंदेनी दिले असे आश्‍वासन की सगळेच झाले खुश

August 9, 2022 | 2:10 pm
gomutra

गोमूत्राचा बीजप्रक्रियेसह कीटकनाशके म्हणून असा करा वापर; होतील मोठे फायदे

August 8, 2022 | 6:07 pm
favarani Pesticides

मजूर टंचाईवर शोधला जालीम उपाय; शेतातील तण काढण्यापासून कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक मशिन

August 8, 2022 | 3:42 pm
Next Post
farmer discovers soybean varieties also obtained patents

शेतकाऱ्याने शोधले सोयाबीनचे वाण; पेटंटही मिळवले

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट