मुंबई : पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी ६ हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले जातात. आतापर्यत या योजनेचे ११ हप्ते झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांना या १२ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे. यंदा शेतकर्यांना पैसे मिळण्यास उशिर झाला असला तरी शेतकर्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकरने मोठा निर्णय घेतला असून ज्या शेतकर्यांनी ई-केवायसी केले त्याच शेतकर्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच योजनेत पारदर्शकता रहावी यासाठी शेतकर्यांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी अनेकवेळा मुदतवाढ देवूनही अनेक शेतकर्यांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या शेतकर्यांनी ई-केवायसी केले त्यांच्याच खात्यावर १२ व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे.
शेतकर्यांना काही अडचण आल्यास केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकही दिला आहे. १५५२६१, १८००११५५२६ किंवा ०११-२३३८१०९२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तर [email protected] यावर देखील मेल करता येणार आहे. ज्या शेतकर्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांनी लागलीच ई-केवायसी हे वेबसाईटवर जाऊन करणे गरजेचे आहे. पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मात्र, अनिवार्य असून शेतकर्यांना ते करावे लागणार आहे.