खतांच्या किंमतीत मोठी वाढ; जाणून घ्या काय आहे कारण

- Advertisement -

नागपूर : आधीच वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना आता पुन्हा खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे खते, बी बियाणे, रासायनिक खते यांच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आधिकची भुर्दंड सोसावी लागणार आहे.

खरीप हंगामात बऱ्यापैकी खते उपलब्ध झाली होती. रब्बी हंगामात खतांचे दर स्थिरावतील अशी अपेक्षा होती. चांगल्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी पेरण्या चांगल्या झाल्या आहेत. सध्या गहू, ज्वारी, मका या पिकांना खतांची गरज आहे. तसेच दुसरीकडे फळबागा, भाजीपाला उसाच्या पिकालाही मोठ्या प्रमाणावर खते लागतात. मात्र, अशात खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावी लागणार आहे. वेगवेगळ्या संकटामुळे आधीच शेतकऱ्यांचे उत्पादन घटले आहे. अशात खतांच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून खतांचा पुरवठा देखील विस्कळीत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याने देशातील सर्वच मिश्र खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. पोटॅश खतांच्या एका पोत्यामागे 700 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. पोटॅशच्या किंमती वाढल्याने इतर खतांच्या दरात 159 ते 250 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे शेती उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असून त्याची झळ आता शेतकऱ्यांना बसणार आहे. करोनामुळे आधीच बिकट असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रासायनिक खतांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.

कोणत्या खतांच्या किंमतीत किती झाली वाढ

10:26:26 खताची खरीप हंगामात 1 हजार 175 रुपयाला मिळणारी गोणी आता 1 हजार 500 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर पोटॅशची एक गोणी खरीपात 1हजार 40 रुपयांना मिळत होती. ती आता 1 हजार 700 रुपयांना मिळणार आहे. अशा प्रकारचे खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

हे देखील वाचा :

हे देखील वाचा