नागपूर : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशूधन आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळ्यात जनावरांची काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यासाठी जनावरांना वेळेवर पौष्टिक आहार देणे, स्वच्छ देखभाल व वैद्यकीय तपासणी करणे. आरोग्य चाचणी करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात शेळ्या जास्त आजारी पडतात त्याचे मुख्य कारण म्हणजे, पावसात ओलावा असताना नवीन चारा बाहेर येतो, त्यावर गोठलेले शेवाळ शेळ्यांचे आरोग्य बिघडवते. त्यामुळे शेळ्यांनाही पोटाचा त्रास होत राहतो. याशिवाय पावसात भिजून योग्य चारा व पाणी न मिळाल्याने शेळ्यांचे आरोग्यही बिघडते. यासाठी शेळ्याच्या आहाराविषयी अधिक सजक राहण्याची आवश्यकता असते.
पावसाळ्याच शेळ्यांची अशी घ्या काळजी
१) पावसाळ्यापूर्वी शेळ्यांना लसीकरण करून घ्यावे आणि जंतविरोधी औषधही पशुवैद्यांच्या सल्ल्याने द्यावे.
२) पावसाळ्यात शेळ्यांना हिरव्या चार्यासोबत कडुलिंबाची पानं द्यावीत, त्यामुळे शेळ्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते.
३) शेळ्यांचा चारा, धान्य आणि पाणी स्वच्छ ठिकाणी ठेवा आणि त्यांना स्वच्छ भांड्यातच खायला द्या.
४) शेळ्या चरताना गवतासह शेवाळही पोटात जाते, त्यामुळे पोटात कृमी होतात. यावर उपाय म्हणून शेळ्यांना दर ३-४ महिन्यांनी पोट साफ करण्यासाठी औषध देत राहा, यामुळे शेळ्यांची भूक वाढते आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते.
५) शेळ्यांना पायाचे व तोंडाचे आजार असल्यास शेळीचे तोंड व खुर लाल औषधाच्या द्रावणाने स्वच्छ ठेवा.
६) शेळी आजारी पडल्यास तिला तीन दिवस हर्बल मसाला बोलस खायला द्यावे.
७) पावसाळ्यात सूर्यप्रकाश असताना शेळ्यांना काही तास बाहेर चरायला सोडा.