पुणे : रब्बी आणि खरीप हंगामात राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट हे दरवर्षी ठरवून दिले जाते. यंदा खरीप हंगामातील सोयाबीनसाठी यंदा हेक्टरी ५३ हजार ९०० रुपये तर उसासारख्या नगदी पिकासाठी १ लाख ३८ हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने बँकांना दिले आहेत. ही प्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
पीककर्जाचे वाटप हे सेवा सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकर्यांना कर्ज मिळते. याकरिता त्या बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी त्या बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जही करु शकतात. शिवाय बँकांना काही गावे ही दत्तक दिली गेली आहेत. त्यानुसार त्या संबंधित गावांना कर्जपुरवठा करणे हे बँकेचे काम आहे.
पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
पीककर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना ७/१२ उतारा, ८ अ, शेतीचा नकाशा, फेरफार, मुल्यांकन म्हणजेच व्हॅल्युनेशन, सर्व रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे.
३१ जूनपर्यंत करावी लागणार प्रक्रिया पूर्ण
खरीपातील पेरणी होण्यापूर्वीच शेतकर्यांना हे कर्ज मिळाले तर त्याचा अधिकचा लाभ होणार आहे. त्यामुळे आतापासूनच ही प्रक्रिया सुरु झाली तर बँकांना त्यांचे उद्दीष्ट साधता येणार आहे शिवाय शेतकर्यांनाही त्याचा योग्य वापर होणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हा प्रशासनाच्या बैठका पार पडत असून जिल्हाधिकार्यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बैठकीत उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना बँक अधिकार्यांना दिल्या आहेत.