औरंगाबाद : अनेक शेतकरी आता पारंपारिक पिकांऐवजी अन्य प्रयोगांकडे वळत आहे. बहुतांश शेतकरी औषधी वनस्पतींची लागवड करून मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे. अशाच एका औधषी वनस्पती लागवडीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ब्राम्ही या वनस्पतीची एकदाच लागवड केल्यानंतर वर्षातून तीनदा कापणी करत त्यातून लाखों रुपयांचे कमाई करता येते.
ब्राम्हीची लागवड खूप फायदेशीर आहे. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्राणी ते खात नाहीत. दुसरीकडे एका एकरासाठी केवळ २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. या पिकाची एकदा लागवड केल्यानंतर वर्षातून तीनदा काढणी करता येते. याशिवाय मका, तूर ही सहपीक म्हणून पेरता येते. एक एकर जमिनीवर ब्राम्हीची लागवड केल्यानंतर एका एकरातून वर्षाला २ ते ३ लाख रुपये सहज कमावत येतात.
रासायनिक शेतीमुळे जमीन नापीक होत आहे. दिवसेंदिवस उत्पादन कमी होऊन खर्च वाढत आहे. वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेण व गोमूत्रापासून जीवामृत, घंजीवामृत आणि आजूबाजूच्या वनस्पतींपासून कीटकनाशक औषधे तयार करुन त्याचा शेतीत वापर केल्यास खर्च कमी होवू शकतो.