पुणे : फुलशेती अनेक शेतकरी करतात व त्यातून मोठा नफा देखील कमवतात. आज आपण आगळ्यावेगळ्या फुलशेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या फुलाची एकदा लागवड केली की ३० वर्षांपर्यंत त्यातून उत्पन्न मिळू शकते. विशेष म्हणजे, या फुल झाडाची पाने, साल, मूळ आणि लाकूड यांचा वापर विविध सेंद्रिय उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. त्याची पावडर आणि तेलही बाजारात चांगल्या किमतीत विकले जाते.
पालाश फुल वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. परसा, धक, तेसू, किषक, सुपका आणि ब्रह्मवृक्ष अशा शब्दांनी ओळखले जाते. पालाश हे फुल त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. होळीचे रंग बनवण्यासाठीही या फुलाचा वापर केला जातो. पालाश वृक्ष एकदा लावल्यानंतर ३५ ते ४० वर्षे जिवंत राहतो. एका एकरात पालाशची ३२०० झाडे लावता येतात, जी ३ ते ४ वर्षात फुले देण्यास सक्षम होतात. तुम्ही त्याची रोपे कोणत्याही प्रमाणित नर्सरीमधून खरेदी करू शकता. पालाश फुलशेती करतांना भाजीपाल्याची आंतरशेती करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.
पलाश हे उत्तर प्रदेशचे राज्य फूल देखील आहे. झारखंड, दक्षिण भारत, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पलाश फुलाची सर्वाधिक लागवड केली जाते. तज्ज्ञांच्या मते, नाक, कान, मल-मूत्र किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असेल तर पलाशच्या सालाचा ५० मिली रस तयार करून थंड झाल्यावर त्यात साखर मिसळून प्यावे, खूप फायदा होतो. पालाशच्या डिंकात १ ते ३ ग्रॅम साखर मिसळून ते दूध किंवा आवळ्याच्या रसात घ्या. यामुळे हाडे मजबूत होतील, तसेच डिंक कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास जुलाबावर उपचार करता येतात.