मुंबई : पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. शिवाय अन्य जे नुकसान होते ते वेगळेच. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने ‘दामिनी अॅप’ नावाचे एक मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे वीज पडण्यापूर्वी १५ मिनिट अलर्ट मिळणार आहे. हे ‘दामिनी अॅप’ गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घेता येणार आहे.
दरवर्षी विज पडून झालेल्या दुर्घटनांनध्ये एकतर शेतकरी किंवा पशूंचा समावेश आहे. त्यामुळे हे अत्याधुनिक असलेले अॅप शेतकर्यांसाठीच अधिक उपयोगीचे ठरणार आहे. हे अॅप जीपीएस लोकेशनद्वारे काम करीत आहे. वीज पडण्याच्या १५ मिनिट आगोदर अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
त्यामुळे आपल्या अॅपमध्ये सभोवताली वीज पडत असल्याच्या सुचना मिळतात. त्यामुळे आपण सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो. अशावेळी मात्र कोणत्याही झाडाचा आसरा घेऊ नये अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या अॅपमुळे शेतामध्ये काम करणार्या मजुर, शेतकरी यांची होणारी जिवितहानी टाळता येणार आहे. हे अॅप शासकीय कर्मचार्यांना डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.