पुणे : हरितगृहात तपमान, आर्द्रता, सुर्यप्रकाश, नियंत्रित केला जातो. त्यामुळे हरितगृहातील वातावरण पिकांच्या वाढीस पोषक असते. हरितगृहांचा वापर आता केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रगतीशिल शेतकरीच नव्हे तर अन्य शेतकरीही मोठ्या प्रमाणात करु लागले आहेत. यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, हरितगृहांचे महत्त्व शेतकर्यांना पटले आहे. हरितगृहांचा वापर करुन उत्पादनाच वाढ करणे शक्य आहे. दुसरे म्हणजे हरितगृह उभारणीसाठी शासनातर्फे अनुदान देखील मिळते.
भारतातील हरितगृहांच्या तुलनेत परदेशातील हरितगृहे हे पुर्णतः संगणीकृत झालेली आहेत. ही आधुनिक हरितगृहे जणु काही वनस्पती तयार करावयाचे कारखानेच आहेत. अशी कोटयावधी झाडे तयार करताना संगणकाच्या मदतीने हवामान, पाणी, अन्नद्रव्य व इतर रोजची कामे केली जातात. त्याप्रमाणे परदेशात काही कामासाठी रोबोटसचा सुध्दा वापर केला जातो. त्यांच्याकडून अगदी जलद गतीने व योग्य पध्दतीने रोपं लावली जातात.
असे काम करते तंत्रज्ञान
सुर्यप्रकाश नियंत्रित करुन, सिंचन ठिबक ससुक्ष्म तुषार सिंचन पध्दत वापरुन, आर्द्रतेचे नियंत्रण करुन, हवा खेळती ठेवुन व गारवा निर्माण करुन तसेच फॅन पॅड पध्दत वापरुन, गरत हवा बाहेर फेकून, स्क्रिनचा वापर करुन. तुषार सिंचन पध्दतीचा वापर करुन या पध्दतींचा वापर करुन हरितगृहातील तापमान व वातावरण नियंत्रित करता येते. यासाठी भारतात वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत परदेशातील तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे.
हरितगृह आच्छादनासाठी याचा होतो वापर
आच्छादनासाठी ग्लास/काच, प्लॅस्टिक, शीट प्लॅस्टिकमध्ये पॉलिइथिलीन, पॉली व्हाईनील, पॉलीइस्टर, पॉली व्हाईनील प्लोराईड तसेच रिजिड प्लॅस्टिकमध्ये पॉली व्हाईनील क्लोराईड, फायबर ग्लास रिफोरसड प्लॅस्टिक, ऍक्रलिक, पॉली कार्बोनेट यांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
हरितगृहाची उंची व रुंदी किती असावी?
उष्ण कटिबंध प्रदेशात हरिगृहात उष्णता कमीत कमी व आर्द्रता जास्तीत जास्त टिकविणे हे वनस्पतीच्या वाढीच्या दृष्टीने महत्वाचे असते. उष्णता दोन महत्वाच्या गोष्टीमुळे कमी होते. एक तर उष्ण हलकी असल्यामुळे हरितगृहाच्या वरच्या बाजुने निघून जाते. व खालच्या बाजुने गार हवा जड असल्यामुळे हरितगृहात येते. व दुसरे म्हणजे कुलिंग पॅड त्यामुळे आतील उष्ण कमी करता येते. त्यामुळे हरितगृहाची उंची ही ४ मी पर्यन्त असावी. परंतु त्याचबरोबर ती हवेच्या वेगालाही टिकली पाहिजे हरितगृहातील हवा खेळती राहण्यासाठी त्याची रचना लांबी व रुदी प्रमाणात असावी. त्यासाठी हरितगृहाची रुंदी कमीत कमी ३५ मी. इतकी असावी.