पुणे : खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर सुमारे तिन ते चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. राज्यात गत आठवड्यात ही प्रक्रिया सुरु झाली असून ३० लाख शेतकर्यांना १ हजार ७७० कोटींहून अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे.
खरिपातील पिकांचा प्रिमियम रक्कम म्हणून शेतकरी आणि मदत म्हणून केंद्र व राज्य सरकार असे मिळून अब्जावधी विमाहप्ता मिळूनही भरपाईसाठी कंपन्यांकडून दुर्लक्ष होत होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. नुकसानचे पंचानामे झाल्यानंतरही विमा कंपन्यांकडून मदत देण्यासाठी टाळाटाळ होत होती. आता शेतकर्यांच्या खात्यावर ही नुकसानीची रक्कम अदा होत आहे. असे असतानाही काही शेतकऱ्यांना भरपाईच्या रकमेबाबत शंका असल्यास त्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, कृषी अधिकारी किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशीं संपर्क साधणे गरजेचे आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या १९ लाख ६६ हजार शेतकर्यांचे दावे हे निकाली काढण्यात आले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या बदल्यात विमा कंपन्यांनी १ हजार ३५१ कोटी रुपये हे अदा केले आहेत. अजूनही १६ लाख ६५ हजार शेतकर्यांना ९६८ कोटी रुपये वितरीत करणे बाकी आहे.
हे देखील वाचा :