पुणे : व्हॅनिला आईस्क्रीम अनेकांचे फेव्हरेट असते. मात्र व्हॅनिला फ्लेवर नेमका येतो कसा? हे तुम्हाला माहित आहे का? मुळात व्हॅनिला हे एका पिकाचे नाव आहे. व्हॅनिला हे केशरानंतर हे जगातील दुसरे सर्वात महाग पीक आहे, त्याची मागणी केवळ भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये आहे. आईस्क्रीम, केक, कोल्ड्रिंक्स, फरफ्यूम आणि इतर सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. एका अंदाजानुसार, जगात बनवल्या जाणार्या आइस्क्रीमपैकी ४० टक्के आइस्क्रीम केवळ व्हॅनिला फ्लेवरचे असते.
आज आपण भारतातील सर्वात महाग पिकांपैकी एक अशा पिकाच्या लागवडीची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी व्हॅनिलाची लागवड करून ३ वर्षांनंतर लाखों रुपयांचा नफा कमवू शकतात. परंतु त्याची लागवड करण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. व्हॅनिलाची लागवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.
व्हॅनिलाच्या लागवडीसाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. अशा तापमानात त्याच्या पिकापासून चांगले उत्पादन मिळू शकते. नाजूक माती व्हॅनिलाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. यासोबतच माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असावी. एवढेच नाही तर जमिनीचे पी.एच. मूल्य ६.५ ते ७.५ दरम्यान असावे. व्हॅनिलाची लागवड करण्यासाठी, त्याचे बियाणे दोन प्रकारे पेरू शकता.