पुणे : पाण्याबरोबर खते व मूलद्रव्ये देण्याच्या या प्रकारास फर्टिगेशन असे म्हणतात. ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याद्वारे पाण्यात विरघळणारी खते योग्य त्या प्रमाणात व पिकांच्या गरजेनुसार परिणामकारकरित्या देता येतात. पिकांच्या मुळांच्या जवळच खत आणि पाणी दिलं जातं. त्यामुळे खत आणि पाणी यांची वापरक्षमता वाढते. ठिबक संचातून युरिया, डायअमोनियम फॉस्फेट व म्युरेर ऑफ पोटॅश ही खते देता येतात. परंतु ही खते अगोदर पाण्यात विरघळवून घ्यावी लागतात. ठिबक सिंचनाव्दारे खते देण्याचे अनेक फायदे आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, द्रवरूप खत पिकांच्या मुळांद्वारे लवकर शोषली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो. त्यामुळे खतमात्रेत २५ ते ५० टक्के बचत होते. तर पाण्यामध्ये ३० ते ५० टक्के बचत होते.
ठिबक सिंचनातून खते दिल्यास होणारे फायदे
१) पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात.
२) दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळते. पीक लवकर तयार होते. उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
३) जमीनीच आरोग्य अबाधित राखलं जात व मजुरीच्या खर्चात बचत होते.
४) ट्रवरूप खतातून पिकाला लागणारी सर्वच्या सर्व अन्नद्रव्य एकाच वेळी दिली जातात.
५) पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात.
फवारणीद्वारे द्यावयाची अन्नद्रव्ये:
डी.ए.पी. फवारणी : एक एकर क्षेत्रावर फवारणी करीता ४ किलो डी.ए.पी. १६० लिटर पाण्यामध्ये फवारणीच्या आदल्या दिवशी (२४ तास आगोदर) प्लॅस्टिक च्या ड्रम मध्ये भिजवत ठेवा. यासाठी धातुचा ड्रम वापरू नये कारण त्यामुळे रासायनिक परिणाम होऊन पिकांच्या पानांवर जळल्यासारखे डाग पडण्याची शक्यता असते. तयार केलेले द्रावण गाळून घेतल्यानंतर ते द्रावण सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा सायंकाळी ४ नंतर पिकांवर फवारावे.
पोटॅशियम नायट्रेट : कापूस पिकावर फुले लागणी व बोंडे धरण्याच्या काळात २ टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.
युरिया : कापूस पिकावर वरील लाल्याची विकृती टाळण्यासाठी तसेच नत्राची कमतरता भरून काढण्यासाठी फुले किंवा बोंडे धरण्याच्या अवस्थेत २ टक्के युरियाची फवारणी करावी.