सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर आणि फळांवरही झाला आहे. एवढेच नाही तर काढणीचा हंगामही लांबलेला आहे परिणामी काजू बीचे उत्पादन घटले आहे. परंतु, उत्पादन घटले तर पिकांच्या किंमतीमध्ये वाढ होते हा बाजारपेठेचा नियमच आहे. पण काजू बीच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. त्यामुळे दरातील चढ-उताराबद्दल संभ्रमतेचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये आहे. उत्पादनात घट दुसरीकडे दरही नाही त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले पण उत्पादनात घट झाल्यावर वाढीव दर तरी मिळाले आहेत पण काजू बीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही.
इतर फळांप्रमाणे काजूचे उत्पादन पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागली होती. अगोदरच अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काजू बागांना मोठा फटका बसलेला होता. यामुळे ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये आलेला मोहोर 20 दिवसांमध्येच कुजून गेला. यानंतर मात्र, डिसेंबरमध्ये थंडीत वाढ झाली आणि पालवी फुटावी म्हणून शेतकऱ्यांनी केलेले प्रयत्न कामी आले. त्यामुळे मोहोर तर आला पण गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हंगामही सुरु झाला आहे.
कोकणातील वेलूर्गा, सावंतवाडी, मालवण, या तालुक्यांमध्ये काजूचा हंगाम लवकरच सुरु झाला होता. पण उर्वरीत भागामध्ये काजू बी परिपक्व होण्यास विलंब झाला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच काजूचा हंगाम तेजीत असतो. मात्र, यंदा मार्च महिना सुरु झाला तरी काजूचे उत्पादन हे सुरु झालेले नाही. असे असूनही दरात वाढ होणे अपेक्षित आहे. पण काजू बीच्या दरात 5 रुपयांनी घटच झालेली आहे. आठवडी बाजारात आवक कमी असूनही काजू बी हे 125 रुपये किलोवरुन थेट 120 रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे काजू बी पीक जोपासण्यासाठी अधिकचा खर्च आणि आता कमी दरात विक्री करण्याची नामुष्की उत्पादकांवर ओढावली आहे.
हे देखील वाचा :