औरंगाबाद : जुलै महिन्यात अतिवृष्टी व संततधार पाऊस झाला. यामुळे राज्यातील १० लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले. सुमारे तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली. मात्र अनेक भागांमध्ये संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने पेरणी करणेच शक्य झाले नाही. त्यामुळे किमान चार लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. बाजरी, सूर्यफूल, तूर पिकाकडे शेतकर्यांचा कल नसल्याने हे क्षेत्र आता रब्बीमध्ये परिवर्तीत होण्याची शक्यता आहे.
खरिपातील मुख्य पिक असलेल्या कापूस व सोयाबीन पेरणी कालावधी आता संपला आहे. पर्यायी पीक असणार्या बाजरी, सूर्यफूल, करडई, तूर पिकांकडे शेतकर्यांचा फारसा कल नाही. सप्टेंबर महिन्यापासून रब्बी हरभर्याची पेरणी सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा खरिपाऐवजी रब्बी हंगामात हरभर्याचे क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. यंदा समाधान कारक पाऊस झाला असल्याने सर्व पाणी साठे तुडूंब भरले आहेत. याचा फायदा रब्बी हंगामात होण्याची आशा शेतकर्यांना आहे.