नाशिक व सांगली जिल्ह्यातून ६८ हजार ४६५ मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात

- Advertisement -

नाशिक : यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, गारपीट, कडाक्याची थंडी व त्यांनतर कडाक्याचे ऊनं अशा अनेक प्रकारची संकटं सोसत महाराष्ट्रातील द्राक्षांनी थेट सातासमुद्रापार मजल मारली आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत यंदा तब्बल ६८ हजार ४६५ मेट्रीक टन द्राक्षाची निर्यात देशातून झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा हा नाशिक जिल्ह्याचाच राहिला असून त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यातून निर्यात झाली आहे.

राज्यात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्ष हंगामाला सुरवात होते. तेव्हापासूनच निसर्गाच्या लहरीपणालाही सुरवात झाली होती. महिन्यातून किमान एकदा तरी अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण हे ठरलेलेच. त्यामुळे सुरवातीला द्राक्ष बागांवर त्याचा परिणाम झाला. बागा जोपासण्यासाठी शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. दोन्ही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक संकटांना तोंड देत द्राक्ष निर्यातीचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून १८ मार्च पर्यंत ५ हजार ६८ कंटेनर मधून ६८ हजार ४६५ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

या देशांमध्ये झाली द्राक्ष निर्यात

नेदरलॅन्ड – ४६,५३२ मेट्रिक टन
युके – ६३५६ मेट्रिक टन
जर्मनी – ६०६१ मेट्रिक ट
पोलंड – ३४४६ मेट्रिक टन
डेन्मार्क – ८५८ मेट्रिक टन
स्पेन – ७३६ मेट्रिक टन

हे देखील वाचा :

हे देखील वाचा