शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; प्रधानमंत्री किसान संपदा योजनेला 2026 पर्यंत मुदतवाढ

- Advertisement -

पुणे : सरकारने प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची (PMKSY) तारीख वाढवली आहे. देशातील शेतकऱ्यांना आता येणाऱ्या काळातही या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांसाठी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने पंतप्रधान किसान संपदा योजनेला (पीएमकेएसवाय) मार्च २०२६ पर्यंत मुतवाढ दिली आहे. या योजनेअंतर्गत चार हजार ६०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

ऑगस्ट 2017 मध्ये देशात प्रधानमंत्री किसान संपदा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतीवर आधारित कामे केली जातात. देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, अन्न प्रक्रिया मंत्रालयाने सांगितले की त्यांची प्रमुख योजना ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ (PMKSY) 4,600 कोटी रुपयांच्या वाटपासह मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मंत्रालयाचे ट्विट

मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले की, PMKSY 2021-22 ते 2025-26 पर्यंत वाढवण्यात आले आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 4,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. PMKSY ही एक सर्वसमावेशक योजना आहे जी शेतीपासून किरकोळ दुकानांपर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळण्यास आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

ही योजना मे 2017 मध्ये सुरू झाली

केंद्र सरकारने मे 2017 मध्ये 6,000 कोटी रुपयांच्या वाटपासह संपदा (शेती-सागरी प्रक्रिया आणि कृषी-प्रक्रिया संकुलांच्या विकासासाठी योजना) योजना सुरू केली होती. ऑगस्ट 2017 मध्ये, या योजनेचे नाव बदलून PMKSY करण्यात आले. या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकीकरणाला चालना देण्यावर सरकारचा भर आहे. अशा परिस्थितीत या सरकारी योजनेतून देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

अशी आहे किसान संपदा योजना

केंद्र सरकारने मे २०१७ मध्ये सहा हजार कोटी रुपयांच्या तरतूदीसह कृषी सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी ‘संपदा’ या नावाने ही योजना सुरू केली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये या योजनेचे नाव बदलून पंतप्रधान किसान संपदा योजना असे करण्यात आले. पीएमकेएसवाय ही कोल्ड चेन, मूल्यवर्धन, पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा, कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठीच्या पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया क्षेत्राचा विकास आणि विस्तार यांचा समावेश असलेली ही एक योजना आहे.

हे देखील वाचा