मुंबई : जुलै महिन्यापासून पाऊस राज्यात ठाण मांडून बसला आहे. सततच्या पावसामुळे खरिप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके पाण्यात आहेत. मात्र याच पावसामुळे राज्यातील लघु आणि मध्यम धरणे तर ओव्हरफ्लो झालीच आहेत पण राज्यातील मोठ्या धरणांमध्येही जवळपास ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामातील सिंचनाची व्यवस्था झाली आहे.
राज्यात परतीच्या पावसाला सुरवात झाल्यानंतर धरणामध्ये पाणीसाठा होण्यास सुरवात होते. गतवर्षीही परतीच्या पावसामुळे वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणामध्ये साठले होते. यंदा मात्र, स्थिती बदललेली आहे. जून महिन्याच्या अपवाद वगळतात जुलै आणि आता ऑगस्टमध्येही पावसामध्ये सातत्य राहिल्याने धरणामध्ये पाण्याची आवक ही सुरुच आहे. धरणातील पाणीपातळी वाढ होत असल्याने पुढील वर्षभर पिण्याची पाण्याची चिंता ही मिटली आहे.
विभागनिहाय धरणातील पाणीसाठा
अमरावती – ७८.८१ टक्के
कोकण – ८९.२८ टक्के
नागपूर – ७१.४७ टक्के
नाशिक – ७१.५९ टक्के
पुणे – ८३.९३ टक्के
औरंगाबाद – ६७.४७ टक्के