Farmers’ e-KYC date extended again : पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर आता १२ हप्त्यासाठी शेतकर्यांना किंवा लाभार्थ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याकरीता केंद्र सरकारने मुदत वाढवली आहे. ई-केवायसीसाठी शेतकर्यांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना आता ३१ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे. यानंतरच आता १२ वा हप्ता मिळणार आहे.
‘पीएम किसान योजना’ ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. यामुळे देशातील लाखों शेतकर्यांना मोठा फायदा होत आहे. मात्र काही अपात्र शेतकर्यांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. लाखो शेतकरी असे आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत पण त्यांच्याही खात्यावर पैसे जमा होत आहेत. केंद्राच्या या योजनेत तत्परता येण्यासाठी ई-केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी पूर्ण करा ई-केवायसीची प्रक्रिया
eKYC करण्यासाठी www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर गेल्यावर ‘Former Coerner’ वरील eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तसे टाकावेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकावा. त्यानंतर Get Otp यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करावा. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा एसएमएस दिसेल. याचाच अर्थ eKYC submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी eKYC करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून eKYC करून घ्यावे लागणार आहे.