पुणे : दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाने पुनरार्गमन केल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र नेमके याचवेळी बियाण्यांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. शिवाय सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताची किंमत ३५० रुपयांनी वाढली आहे. एमओपीचे दर ७३० रुपये, अमोनियम सल्फेट ३०० रुपये. १५:१५:१५ चे दर दोनशे रुपये, २०:२०:०० चे दर २९० रुपयांनी वाढले आहेत. शेतकर्यांनी बियाणे व एसएसपीच्या दरात ४३ रुपयांनी वाढ झाली आहे. बियाणांचा खर्च वाढला. खतांच्या किमतीत वाढ आली. दुसरीकडं डिझेडच्या किमती मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलं आहे. Financial Planning of Farmers
बियाणे व खतांच्या किमतीतील दरवाढीसोबतच मशागत, पेरणी व नंतरची कामे याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकर्यांसाठी तुलनेने महाग ठरणारा आहे. युरिया वगळता उर्वरित सर्वच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. धानाच्या दरात गतवर्षीपेक्षा प्रतिबॅग २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी युरियाची ४५ किलोची गोणी २६६ रुपयांची होती. यंदाही त्याच भावात उपलब्ध आहे.
खरिप हंगामात सर्वाधिक मागणी डीएपी खताची असते पण, याच खताच्या किमतीत वाढ झाली आहे. तब्बल ३५० रुपयांनी डीएपी खतावर वाढले असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खताच्या किमतीत वाढ झाल्यानं आता वाढीव खर्च कसा करावा, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.