औरंगाबाद : राज्यात सोयाबीनचा पेरा जास्त प्रमाणात असून त्यामानाने प्रक्रिया उद्योग मात्र कमी आहेत. याच अनुषंगाने आज आपण सोयाबीनपासून रोजच्या जीवनातील कोणते पदार्थ तयार केले जावू शकतात याची माहिती घेणार आहोत. सोया केक, बिस्कीट, सोया दूध, पनीर, सोया पापड, वडी, सोया पनीर पकोडे, सोया आटा, सोया लडू, ओकरा हलवा, गुलाबजामून, इ. पदार्थ तयार केले जातात.
सोया पनीर हा त्याला स्वास्थ्य व पौष्टिक पर्याय आहे. डेअरीच्या दुधापासून केलेल्या पनीमुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते; परंतु हे यापासून मुक्त आहे. एक किलो सोयाबीनची किंमत ३५ ते ४० रु. आहे. त्यापासून अंदाजे १.५ किलो सोया पनीर मिळू शकते. हे पनीर सुमारे २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री केले जाते.
या व्यतिरिक्त सोयाबीनपासून अन्य पदार्थ देखील तयार केले जातात. त्याची माहिती खालील प्रमाणे,
सोयाबीन पीठ : सोयाबीनची डाळ साल काढण्यासाठी अर्धा तास उकळत्या पाण्यामध्ये ठेवा. ओली डाळ उन्हामध्ये सुकवा, वाळल्यावर चक्कीमधून किंवा मिक्सरमध्ये काढा. तयार झालेले पीठ पॅकबंद डब्यामध्ये ठेवा आणि त्याचा उपयोग पदार्थामध्ये करा.
सोयादूध : सोयाबीनची डाळ चार ते सहा तास भिजवून ठेवा. भिजलेली डाळ घेतलेल्या पाण्यासोबत बारीक वाटून घ्या आणि उरलेले पाणी त्यात मिसळून घ्या. तयार झालेले मिश्रण कपड्यामधून गाळून घेऊन ते मिश्रण १५ ते २० मिनिटे उकळून घ्या. तयार झालेल्या दुधात आवडीनुसार साखर आणि इसेन्स मिसळा. दूध उपयोगात आणण्यासाठी तयार झालेल्या दुधाचा वापर चहा करण्यासाठी सुद्धा केला जातो.
सोयापनीर : सोयाबीनची डाळ ४-६ तास भिजवून ठेवा. सोयाबीन भिजलेली डाळ घेतलेल्या पाण्यासोबत बारीक करून घ्या आणि उसलेले पाणी त्यामध्ये मिसळून घ्या. तयार झालेले मिश्रण १५-२० मिनिटे उकळून घ्या आणि नंतर ते कपड्यातून गाळून घ्या. गाळून घेतल्या नंतर कपड्याच्या बर जे राहील ते दूध होय. याचा उपयोग गुलाब जामून, हलवा, बिस्कीट इ. पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.
सोया दही : सोयाबीनचे दूध बनविण्यासाठी डाळ भिजवावी, भिजलेली डाळ तिप्पट चौपट पाणी घेऊन बारीक करून घ्यावी. तयार झालेल्या दुधात दही मिसळून गरम जागेत ६ ते ८ तास ठेवून द्यावे. स्वादिष्ट दही उपयोगात आणण्यासाठी तयार.