• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result

मोसंबी, चिकु, पेरु, डाळीब, लिंबू व सिताफळसाठी फळपिक विमा योजना; वाचा सविस्तर

डॉ. युवराज परदेशी by डॉ. युवराज परदेशी
June 2, 2022 | 2:19 pm
in बातम्या
Fruit crop insurance plan

जळगाव : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2022 – 23 या दोन वर्षाकरिता मृग बहाराकरिता लागु करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी मृग बहार मोसंबी, चिकु, पेरु, डाळीब, लिंबू व सिताफळ या फळपिकांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये महसुल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन ही योजना फळपिकासाठी अधिसुचित मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे.

या योजनेव्दारे मृग बहार फळपिकनिहाय पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता या हवामान घटकाच्या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे. सदर योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारपैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. मोसंबी व डाळीब) जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणा पत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

मृग बहार 2022-23 करिता पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभागाचे वेळापत्रक व विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे.

मृग बहार 22-23 विमा संरक्षित रक्कम/ हेक्टर, विमा हप्ता रक्कम/ हे, अंतिम मुदत

चिकू – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 60,000, विमा हप्ता रक्कम -7800/- , अंतिम मुदत -30 जुन 2022, डाळींब – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 1,30,000, विमा हप्ता रक्कम -6500/- , अंतिम मुदत – 14 जुलै 2022, पेरु – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 60,000, विमा हप्ता रक्कम -3000/- , अंतिम मुदत -14 जुन 2022, मोसंबी – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 80,000/-, विमा हप्ता रक्कम -4000/- , अंतिम मुदत -30 जुन 2022, लिंबू – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 70,000/- , विमा हप्ता रक्कम -3500/- , अंतिम मुदत -14 जुन 2022, सिताफळ – विमा संरक्षित रक्कम / हेक्टर 50,000, विमा हप्ता रक्कम -2750/- , अंतिम मुदत – 31 जुलै 2022,

जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग बहाराकरिता फळपिकांना राबविण्यात येत आहे. तरी विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –

आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, मंडळ तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सव), तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुका), उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्स्चें टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई 400023, टोल फ्री नंबर -18004195004, ई मेल [email protected]

जिल्हा प्रतिनिधी, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्रं. 9595554473

टिप- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईडवर www.maharastra.gov.in उपलब्ध आहे.

डॉ. युवराज परदेशी

डॉ. युवराज परदेशी

ताज्या बातम्या

shen

शेणाची वर्षभरासाठी होतेय बुकिंग; ‘या’ कारणामुळे अचानक वाढले शेणाचे महत्व

June 25, 2022 | 10:36 am
kapus-cotton-market-rate

कापूस लागवडीआधी शेतकर्‍यांना सतावतेय ही चिंता; वाचा सविस्तर

June 25, 2022 | 8:30 am
cow

शेतकऱ्यांनो तुमचे पशुधन आजारी तर पडले नाही ना? असे तपासा

June 24, 2022 | 4:18 pm
fertilizer

‘लिंकिंग’मुळे शेतकरी त्रस्त

June 24, 2022 | 2:56 pm
farmer-in-tension

नंदुरबार जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी पीएम किसान निधीपासून वंचित राहणार? हे आहे प्रमुख कारण

June 24, 2022 | 2:00 pm
soyabean-bajarbhav

आज २ वाजेपर्यंतचा सोयाबीन बाजार भाव : Today Soyabean Bajar Bhav 24/06/2022

June 24, 2022 | 1:50 pm
  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group