• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

खासगी सावकाराचा जाच नको असल्यास शेतमाल तारण ठेवून मिळवा अवघ्या ३ टक्के व्याजदराने कर्ज

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
August 5, 2022 | 2:09 pm
indian currency

पुणे : शेतकर्‍याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी येतो. साहजीकच शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. सदर शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकर्‍यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येते.

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असून या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या ७५ टक्के पर्यंत रक्कम ६ महिने (१८० दिवस) कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रिय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकर्‍यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सदर योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणार्‍या बाजार समित्यांना ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते.

शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत व व्याजदर
सोयाबीन, तुर, मुग, उडिद, चना, भात (धान) करडई, सुर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका व गहू या पिकांसाठी एकूण किंमतीच्या ७५% रक्कम. (प्रचलित बाजार भाव किंवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी असेल त्या दराने होणार्‍या एकुण किंमतीच्या) ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांसाठी देण्यात येतात.
वाघ्या घेवडा (राजमा) या पिकासाठी एकूण किंमतीच्या ७५% रक्कम. किंवा रु.३०००/- प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांसाठी देण्यात येतात.
काजू बी साठी एकूण किंमतीच्या ७५% रक्कम. किंवा रु.१००/- प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांसाठी देण्यात येतात.
सुपारीसाठी एकूण किंमतीच्या ७५% रक्कम. किंवा रु.१००/- प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांसाठी देण्यात येतात.
बेदाणासाठी एकूण किंमतीच्या कमाल ७५% किंवा जास्तीत जास्त रु. ७५००/- प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम ६ टक्के व्याजदराने ६ महिन्यांसाठी देण्यात येतात.

शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकर्‍यांचाच शेतीमाल स्विकारला जातो. व्यापार्‍यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही. प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किमंत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते. तारण कर्जाची मुदत ६ महिने (१८० दिवस) असुन तारण कर्जास व्याजाचा दर ६% आहे. तारण कर्जाची १८० दिवस मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीस पणन मंडळाकडून १% किंवा ३% व्याज प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही.
तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणुक, देखरेख व सुरक्षा बाजार समिती विनामुल्य करते. तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची राहते. राज्य अथवा केंद्रिय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही बाजार समित्यांकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

ratal

या पिकातून केवळ १३० दिवसात कमवा लाखों रुपयांचा नफा

August 13, 2022 | 3:58 pm
plan tree

सप्टेंबरमध्ये या पिकांची लागवड करा आणि भरघोस नफा मिळवा

August 13, 2022 | 3:12 pm
kanda-bajarbhav

तीन महिन्यांपासून कांद्याने शेतकर्‍यांना रडवले, नाफेडमुळे कांदा उत्पादक अडचणीत

August 13, 2022 | 2:22 pm
wheat

या एका निर्णयामुळे गव्हाच्या किंमती स्थिर झाल्या; वाचा सविस्तर

August 13, 2022 | 1:55 pm
udit dal tur dal

अति पावसामुळे तूर डाळ आणि उडीद डाळींच्या किंमतीवर होतोय असा परिणाम

August 11, 2022 | 4:07 pm
top 10 tractor

क्या बात है…जुलै महिन्यात ५९ हजार ५८६ ट्रॅक्टर विक्री

August 11, 2022 | 3:31 pm
Next Post
Road Transport Subsidy Scheme

आंतरराज्य शेतमाल वाहतूकीसाठी शेतकर्‍यांना मिळू शकते ३ लाखांपर्यंतचे अनुदान; असा मिळवा लाभ

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट