मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल व व्हायरल फोटो किंवा व्हिडीओमुळे कोण कधी हिरो बनून जाईल, हे सांगता येत नाही. याच सोशल मीडियामुळे एक शेळी इंटरनेटवर स्टार झाली आहे. ही शेळी स्टार होण्याचे कारण म्हणजे, तिचे कान! होय अगदी बरोबर वाचले आहे तुम्ही, या शेळीचे कान इतके मोठे आहेत की ते जमिनीला स्पर्श करतात. या शेळीचे फोटो सध्या सोशल मीडियावर इतके व्हायरल होत आहेत की आता ती जगभरात लोकप्रिय झाली आहे. (Goat with the longest ears in the world)
या शेळीचे नाव सिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा जन्म सिंधमध्ये ५ जून रोजी झाला. या शेळीची जात न्यूबियन आहे. या जातीला लांब कान असलेली बकरी म्हणून ओळखले जाते. या बकरीच्या कानाची लांबी सुमारे १९ इंच म्हणजेच ४६ सेमी आहे. या शेळीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरच समाविष्ट होईल, असा विश्वास शेळीच्या मालकाने व्यक्त केला आहे.