शेतशिवार । जळगाव : रब्बी हंगामात हरभरा क्षेत्र वाढत आहे. यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. मात्र झालेले नुकसान विसरुन शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागला आहे. आधीच दमदार झालेला पाऊस व आता हळूहळू वाढणारी थंडी रब्बीच्या पीकांसाठी पोषक आहे. यंदा रब्बी हंगामातील मुख्य पीकांपैकी एक असलेल्या हरभराचे क्षेत्र वाढले आहे. पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे ज्वारीची पेरणी करता आली नाही.
शेतकऱ्यांनी हरभरा (harbhara) याच पिकावर भर दिला आहे. शिवाय कृषी विभागानेही हरभर्याचे उत्पादन घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. यंदा पिकासाठी पोषक वातावरण असले तरी वाढत्या किडीचा धोकाही त्याच प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापासून पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण हरभर्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी कीड व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हरभर्याचे उत्पादन घेतांना शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठी डोकंदूखी म्हणजे घाटे अळीचा (ghate ali) प्रादूर्भाव!
घाटेअळीचा प्रादूर्भाव वाढण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे, अनेक शेतकरी देशी वाणांपेक्षा काबुली वाण याला अधिक प्रमाणात बळी पडतात त्यामुळे कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. लहान आळ्या सुरुवातीला कवळी पाने, कळ्या, फुले, कुरतडून खातात घाटे भरल्यानंतर आणि घाट्यात डोके खुपसून दाणे फस्त करतात. साधारण एक आळी ही ३० ते ४० झाड्यांचे नुकसान करते त्यामुळे उत्पादनात घट होते.
आळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकासाठी धोकादायक
१) पाने पोखरणारी आळी ही ३ मी लांब असते. ही आळी पानाचा हिरवा भाग खाऊन उपजिवीका करते. अळीचा अधिकचा प्रादुर्भाव झाल्यास पानगळीला सुरवात होते. त्यामुळे पिकाची वाढ तर खुंटतेच पण उत्पादनावरही याचा परिणाम होतो.
२) लष्करी आळी हिरव्या रंगाच्या असून २५ मिमी लांब असते. यामुळे हरभर्याचे झाडेही पान विरहीत होतात कधीकधी हरभर्याच्या घाटावर देखील ही अळी आक्रमण करते. थेट उत्पादनावरच परिणाम होत असून याचे प्रमाण वाढले तर ऐन बहरातच पिकांचे नुकसान होते.
३) रोप कुरतडणार्या आळी केळी काळपट रंगाचे असून ४० मी लांब असते. तर रात्रीच्या वेळेस हरभर्याचे रोपटे ही आळी जमिनीलगतच कापते आणि कावळ्या पानावर आपली उपजीविका करते. पाने खाण्यापेक्षा पाणी कापल्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते.
४) घाटे आळी शेळी अमेरिकन बोंड आळी हिरवी बोंडअळी हरभर्यातील घाटे आळी व शेंगा पोखरणार्या आळी या नावाने ओळखले जाते. आळीचा प्रादुर्भाव कडधान्यांमध्ये तूर, हरभरा, वाटाणा, उडीद, मूग, मसूर तसेच चवळी व याचा प्रादुर्भाव होतो.
असे करा व्यवस्थापन
घाटेअळीचा प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रतिहेक्टर एच. एन. टी २५० रोगग्रस्त यांचा अर्थ फवारा वा याकरिता अर्धा लिटर पाण्यात ५० ग्रॅम राणी पण टाकून हे द्रावण एक मिलि प्रति लिटर प्रमाणे अर्कात मिसळून फवारणी करावी हे फवारणी पिक शेतात प्रथम आणि द्वीतीय अवस्थेत असताना केल्यास अतिशय प्रभावी होते. त्यामुळे वेळेत आळीचा बंदोबस्त होतो तर पिकाच्या वाढीतील अडथळाही दूर होतो. आळीचा प्रादुर्भावा आर्थिक नुकसानीच्या पातळीवर पोहोचल्यास एन्डोसल्फान २० मिली क्विनॉलफॉस २० मिली मोनोक्रोटोफास अकरा मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.