जळगाव : जा आपण शेत जमीनीचे सातबारा उतारे किंवा शेत जमीनी संबंधी दस्तऐवज पहिले तर त्यामध्ये आपल्याला गुंठा, एकर, हेक्टर, आर या मोजमाप एककाचा वापर पाहायला मिळतो. मात्र गुंठा, एकर, हेक्टर यातील फरक अनेकांना माहित नसतो. यामुळे आज आपण गुंठा, एकर, हेक्टर यामधील फरक व त्याची मोजणी कशी करतात? याची माहिती जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ गुंठा = १०८९ चौ फुट
१ आर = १०७६.३९ चौ फुट
१ एकर = ४० गुंठे
आर म्हणजे १०० चौरस मीटरचा १ आर असतो.
एका हेक्टर मध्ये एक लाख सात हजार ६३९ चौरस फूट असतात.
एक मीटर बाय एक मीटर बरोबर एक चौरस मीटर तयार होतो जेव्हा असे दहा हजार चौरस मीटर तयार होतात त्यावेळी एक हेक्टर तयार होतो.
गुंठ्या मध्ये जमीन मोजणी कशी करावी ?
क्षेत्रफळ = लांबी बाय रुंदी
गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ (चौरस फूट) / १०८९
एकर = गुंठे / ४०
जमीन मोजणी
जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते.