पुणे : शेती किंवा पिण्याच्या पाण्याची गरज भागविताना जमिनीतून पाणी उपसण्यासाठी किंवा पाणी वर चढवण्यासाठी विद्युत ऊर्जेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. कृषि क्षेत्रात समान्यत: ३ फेज इंडक्शनच्या मोटारींचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शेतीसाठी वापरण्यात येणार्या विद्युत मोटारी व पंपाची निगा व्यवस्थित ठेवल्याने त्यांचे आयुष्यमान वाढते. मात्र अनेकदा विद्युत मोटारींची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही. यामुळे शेतकर्यांना विजेचा शॉक लागण्याच्या घटनाही अनेकवेळा घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी शेतातील विद्युत मोटारींची काळजी कशी घ्यावी, याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
विद्यूत मोटार का जळते?
अनेकवेळा मोटार जळण्याचे प्रकार घडतात. याची प्रमुख करणे म्हणजे, सुरुवातील मोटार स्टार्ट करण्यासाठी जे यंत्र वापरतात त्याला स्टार्ट म्हणतात. मोटार सुरू होताना नेहमीच्या मानाने १० ते १५ पट विजेचा प्रवाह जास्त घेतात. त्यामुळे ती जळण्याची शक्यता असते. ती जळू नये म्हणून स्टार्टर वापरतात. या शिवाय स्टार्टरचे मुख्य कार्य म्हणजे मोटारीचे करंट आणि नो व्होल्टेज पासून संरक्षण करणे त्याचबरोबर इतर कारणांमुळे स्टार्टरला फार महत्त्व आहे.
उंदीर, पाली, झुरळे, लहान बेडूक मोटारीत गेल्यास त्यांचा उघड्या तारांशी स्पर्श झाल्यास तारांमधील विद्युत प्रवाह अनियमित होऊन मोटार जळते. त्यासाठी मोटारीला झाकण करून घ्यावे. कमी विद्युत दाबावर मोटार जास्त वेळ चालवल्यास जळते. रोटर आणि स्टेटर एकमेकांवर घासले गेल्याने मोटार जळते. बेअरींग नेहमी निकामी होते. मोटार सुरू असताना अनियमित आणि घरघर असाल आवाज होतो. तेव्हा बेअरींग खराब झाली असे समजावे.
फाउंडेशन समपातळीत नसल्यास, वेळोवेळी ग्रीस व तेल न दिल्यास कमी प्रतीचे बेअरिंग वापरल्यास, मोटार सतत जास्त वेळ चालवून तिला अजिबात विश्रांती न दिल्यास बेअरिंग निकामी होतात. जास्त घासलेले बेअरींग वापरल्यास रोटरला स्टेटर घासले जाते किंवा मोटारीवर जास्त लोडयेऊन मोटार जळू शकते.
अशा पध्दतीने घ्या विद्यूत मोटारीची काळजी
मोटारीची स्वच्छता करतांना सर्वप्रथम वीजपुरवठ्यापासून मोटार पूर्णपणे सोडवून घ्यावी. मोटारीचा बाहेरील भाग स्वच्छ कापडाने अगर ब्रशने साफ करावा. मधला शाफ्ट फिरवून पहावा. चार लांब बोल्ट काढून बाजूचे ‘रोटर’ वेगळे करावे. त्यानंतर दुसर्या बाजूच्या कवचासह ‘रोटर’ बाहेर काढावा. तो काढताना तारा तुटणार नाहीत याची तसेच तारांवरील कवच (इन्शुलेशन) घासणार नाही, याची काळजी घ्यावी.
मोटारीतील ब्रश व होल्डर हे भाग कार्बन टेट्राक्लोराईड या रसायनाचा वापर करून स्वच्छ करता येतात, मात्र झिजलेले किंवा तुकडे निघालेले ब्रश बदलून घ्यावेत.
कॉम्युटेटरवर काळे डाग पडले असतील, तर कार्बन टेट्राक्लोराईड मध्ये भिजविलेल्या कापडाने ते स्वच्छ करावेत किंवा बारीक सॅण्ड पेपरने घासून काढावे. या कामासाठी एमरी पेपर वापरू नये.
विद्युत प्रवाहाचा दाब (व्होल्टेज) योग्य असल्याची खात्री करावी.
मोटारीवर कामाचा वाजवीपेक्षा जास्त ताण पडू देऊ नये.