जळगाव : मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेत शिवारांमध्ये नांगरणी, मोगडणी आणि कुळवणी आदी कामांना वेग आला आहे. पेरणीपूर्वी शेती मशागतीला महत्व का असते? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हंगामापूर्वी शेती मशागत आवश्यक असते. उत्पादन वाढीसाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे. वर्षातून एकदा ही मशागत केल्याने शेतजमिन भुसभुशीत होते. शिवाय यामुळे जमिनीचा पोत वाढतो तर तणविरहीत पिकांसाठी मशागत करणे गरजेचे आहे. उन्हाळी पिकांची काढणी होताच पावसाला सुरवात होईपर्यंत ही कामे आटोपून घेतली जातात. यातच आता मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावल्याने शेती कामांना वेग आला आहे.
हे देखील वाचा : शेतमजूर मिळत नाहीत आणि डिझेलचे दरही कमी होत नाही; सांगा शेती मशागत करायची कशी?
शेतकर्यांची मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असताना आता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेत जमिन ही पेरणी योग्य होणार असून यंदा खरिपात उत्पादन वाढेल अशी आशा शेतकर्यांना आहे. शिवाय मान्सूनचे आगमनही वेळेत होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे यंदा सर्वकाही वेळेवर झाले तर गतवर्षी खरिपात झालेले नुकसान भरपाई यंदा निघेल असा आशावाद शेतकर्यांना आहे.