• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

फळ पीक विमा संदर्भात महत्वाची माहिती

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
October 22, 2022 | 11:46 am
Fruit crop insurance plan

जळगाव : प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2022- 23 या वर्षाकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी आंबिया बहाराकरीता केळी, मोसंबी, पपई, आंबा व डाळिंब या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन अधिसुचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यात या योजनेव्दारे आंबिया बहार फळ पीकनिहाय केळी या पिकासाठी कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, मोसंबी या फळपिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट, पपई फळपिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता गारपीट, आंबा फळ पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, तर डाळिंब या फळ पिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे.

ही योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसूचित फळ पिकांपैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज (उदा.मोसंबी व डाळिंब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकाकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत संबधित बँकेस त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल. या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

आंबिया बहार 2022-23 करीता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभागाचे वेळापत्रक, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत अशी : केळी – विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,40,000/- गारपीट -46,667/-, विमा हप्ता रक्कम – 10500/- 2333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, मोसंबी – विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 80,000/- गारपीट -26,667/-, विमा हप्ता रक्कम – 4000/- 1333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, पपई -विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 35,000/- गारपीट -11,667/-, विमा हप्ता रक्कम – 1750/- 583/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, आंबा -विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,40,000/- गारपीट -46,667/-, विमा हप्ता रक्कम – 23800/- 2333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2022, डाळिंब- विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,30,000/- गारपीट -43333/-, विमा हप्ता रक्कम – 28600/- 2167/- अंतिम मुदत 14 जानेवारी, 2023 पर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषी अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई, क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई – 400023, टोल फ्री नंबर-1800 419 5004, ई – मेल [email protected] जिल्हा प्रतिनिधी, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्र. 9595554473 यांच्याशी संपर्क साधावा. टिप – सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईडवर www.maharastra.gov.in वर उपलब्ध आहे.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
indian currency

इंजिनीअरची नोकरी सोडून गाय पाळायला सुरुवात केली, आता महिन्याला लाखो रुपयांची कमाई

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट