तीन एकरात आंब्यातून १८ लाखाचे उत्पन्न, वाचा सविस्तर

kesar mango

सोलापूर : आंब्याचा सिझन शेवटच्या टप्प्यात आहे. यंदाच्या हंगामात हापूस पाठोपाठ केशर आंब्यांना मोठी मागणी होती. याच केशर आंब्याने एका शेतकर्‍याला मालामाल केले, याची इंट्रेस्टिंग स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. केवळ ३ एकरमध्ये लावलेल्या केशर आंब्यातून शेतकर्‍याने थोडेथोडके नव्हे तर १८ लाखांचे उत्पन्न कमविले आहे.

सोलापूरच्या दक्षिण तालुक्यातील दर्गनहळ्ळी येथील केदारनाथ बिरजदार यांनी तीन वर्षापूर्वी त्यांनी ३ एकरामध्ये केशर आंब्याची लागवड केली होती. आज केशर आंब्याची निर्यात होत असून त्यांना यामधून १८ लाखाचा फायदा झाला आहे. केशरचा हंगाम हा उशिराचा असला तरी त्याला आता परदेशातून मागणी वाढत आहे. दर्जेदार आंब्याची निर्यात झाल्यानेच प्रतिकूल परस्थितीमध्येही भरघोस उत्पादन मिळाल्याचे बिरजदार यांनी सांगितले आहे.

उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक शेती पध्दतीचा उपयोग नाही तर शेतकर्‍यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. शेती व्यवसायाला सुरवात करतानाच बिरजदार यांनी हे सूत्र अंमलात आणले होते. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत तीन एकरामध्ये केशर आंब्याची लागवड केली होती. अवघ्या तीन वर्षात आंब्याला फलधारणा झाली असून आता हा आंबा सातासमुद्रापार जात आहे. शेतीमध्येही पारंपरिक शेतीला महत्व नाही तर फळबागांमधूनच उत्पादन वाढविता येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version