सोलापूर : यंदा वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. आंबा आणि द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली असली तर काही जिल्ह्यांमध्ये डाळिंब बागा मोडाव्या लागल्या आहेत. याचे प्रमाण सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण पीन होल बोरर अर्थात खोडकिडीमुळे डाळिंबाच्या संपूर्ण बागाच धोक्यात आल्या आहेत.
मध्यंतरी खोडकिडीचा नेमका परिणाम काय याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक थेट बांधावर दाखल झाले होते. त्यानंतर डाळिंब उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी परिषदेस जलतज्ञ राजेंद्रसिंह, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दिपक साळुंखे उपस्थित होते.
सांगोल्यात डाळिंबाचे तर नाशकात द्राक्षाचे नुकसान झाले आहे. रोगांसह किडीवर उपाययोजना शोधण्याचे काम हे कृषी विद्यापीठांसह कृषी विज्ञान केंद्राचे आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक भागात संशोधन केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी शेतकर्यांना ना. भुजबळांकडून देण्यात आले.
शेतकर्यांना मार्गदर्शन हाच संशोधन केंद्राचा खरा उद्देश आहे. मात्र, डाळिंब बागा धोक्यात असताना किंवा वातावरणातील बदलानंतरही संशोधन केंद्राकडून शेतकर्यांना योग्य असे मार्गदर्शन झाले नसल्याचा सूर या शेतकरी परिषदेत उमटला. संशोधन केंद्राकडून उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम झाले आहे, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
हे देखील वाचा :
- मल्टी लेयर फार्मिंग तंत्रातून शेतकरी कमवू शकतात ३ ते ४ पट नफा; जाणून घ्या सविस्तर
- शेतातील मातीची सुपिकता वाढविण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला; तुम्हीही अवलंब करा होईल मोठा फायदा
- पीकविमा योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांची संख्या तब्बल ८ लाखांनी वाढली, हे आहे कारण
- नुकसानग्रस्त शेतकर्यांना मुख्यमंत्री शिंदेनी दिले असे आश्वासन की सगळेच झाले खुश
- गोमूत्राचा बीजप्रक्रियेसह कीटकनाशके म्हणून असा करा वापर; होतील मोठे फायदे