इंदापूर : ऊस तोडणी चालु असताना थेट ऊसाच्या फडामध्ये जाऊन ऊस तोडणी मजूरांची आरोग्य तपासणी व जागेवरती मोफत औषधोपचार देण्याचा अभिनव उपक्रम शंकरराव पाटील चारिटेबल ट्रस्टच्या वतीने वर्धा जिल्ह्यात राबवण्यात आला. चालू हंगामात या ट्रस्टच्या माध्यमातून ५ हजार १०० ऊसतोड मजूरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
शंकररावजी पाटील चारिटेबल ट्रस्टच्या शंकरराव पाटील आरोग्य केंद्रातर्फे गेल्या २ वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिरात किरकोळ आजारांवर जागेवरच मोफत औषधे दिली जातात तर गंभीर आजार असल्यास ऊसतोडणी मजुरांवर परिसरातील दवाखान्यामध्ये पुढील उपचार केले जातात.
कर्मयोगी शंकररावजी पाटील व नीरा भीमा कारखाना या दोन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राबविला जात असणारा हा समाजोपयोगी उपक्रम राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी राबवण्यावीण्याची अपेक्षा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेशी चर्चा झाली आहे. या अनोख्या उपक्रमाचे शासनाच्या मंत्री समितीसमोर सादरीकरण केले जाणार आहे.
हे देखील वाचा :