पुणे : मधमाशीपालनाकडे आता शेतकर्यांचा कल वाढतांना दिसत आहे. मधमाशीपालन हा हमखास नफा देणारा व्यवसाय असल्याने तरुणवर्ग या व्यवसायात रस घेतांना दिसत आहे. भारतात ८०००० दशलक्षपेक्षा जास्त मधाचे उत्पादन होते. हा मध भारतीय बाजारपेठेतून परदेशातही निर्यात केला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही जर मधमाशीपालनाचा व्यवसाय केला तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो, पण चांगला नफा मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारची मधमाशी, कोणती मधमाशी पाळायची याचीही माहिती असली पाहिजे, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. यासाठी आज आपण कोणत्या प्रकारच्या मधमाशांपासून उच्च प्रतीचे व जास्त मध मिळवू शकतो, हे जाणून घेणार आहोत.
सामान्य मधमाशांपेक्षा ३ पट जास्त मध उत्पादन घेण्यासाठी इटालियन मधमाशी पालन हा सर्वोकृष्ट मार्ग मानला जातो. या प्रजातीच्या मधमाश्या चारही दिशांनी मध गोळा करतात आणि त्यांच्या घरी परततात. एवढेच नाही तर इटालियन मधमाशांची लोकसंख्या अल्पावधीतच सुमारे ५० हजारांवर पोहोचते आणि ती मध तीन पटीने गोळा करु शकतात. इटालियन मधमाशांची योग्य काळजी आणि युनिटचे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति पेटी सुमारे ४० ते ५० किलो मध उत्पादन मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही बागांसह इटालियन मधमाशीपालन केले तर तुम्ही त्यातून आणखी नफा मिळवू शकता.
इटालियन मधमाशीच्या मधाचा दर्जा इतर मधमाशांच्या तुलनेत खूप चांगला आहे. कदाचित त्यामुळेच देशांतर्गत आणि परदेशी बाजारात त्याची किंमतही खूप जास्त आहे. यामुळे शेतीसोबत जोडधंदा म्हणून हा उत्तम मार्ग आहे. नाबार्ड आणि राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्याही मधमाशी पालनासाठी अनेक योजना आहेत, ज्याचा देशातील शेतकर्यांना फायदा होत आहे. मधमाशी पालनासाठी भारत सरकारकडून सुमारे ८० ते ८५ टक्के आर्थिक अनुदान दिले जाते.