दोन तोंडाचे रेडकू; चार डोळे आणि दोनच कान

- Advertisement -

कडेगाव : येथील हनुमंत कृष्णत गोरे यांच्या म्हशीने दोन तोंडाचे आणि चार डोळ्याचे रेडकूला जन्म दिला. म्हशीने या दोन तोंडाच्या रेडकूला जन्म दिला. अत्यंत दुर्मिळ असणारी ही घटना पाहण्यासाठी कडेगावसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या वासराला चार डोळे होते. त्याचे चारही डोळे सोबतच बंद होतात तसेच उघडतात. दोन डोकी एकमेकांना जोडलेले असल्याने दोन्ही बाजूला दोनच कान आहेत. वासराचे दोन्ही तोंडे स्पष्टपणे दिसतात. शरीराच्या तुलनेत मान मोठी असल्याने वासराला उभे राहण्यास कशाचातरी आधार घ्यावा लागत आहे. परंतु या वासराला असलेली दोन तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे  डोक्याचे वजन वासरु पेलू शकले नाहीये. तसेच दोन डोक्यांचे वजन जास्त झाल्यामुळे वासराला उभे राहण्यास अडचणी येत होत्या.

या अगोदर गोरे यांच्या म्हशीने 3 रेडकांना जन्म दिला आहे ती सर्वसाधारण आहेत मात्र चौथ्या वेळी गोरे यांच्या म्हशीने चक्क दोन तोंडाच्या आणि चार डोळ्याच्या रेडकाला जन्म दिला आहे. या रेडकला दोन तोंडे असल्याने म्हशीचे दूध पिता येत नव्हते तरीही हनुमंत गोरे यांनी या रेडकाला बाटलीने दूध पाजले दोन दिवस हे रेडकू दूध पीत होते मात्र तिसऱ्या दिवशी दोन तोंडाचे वजन सहन होत नसल्याने या रेडकाचा मृत्यू झाला. मात्र दोन तोंडाचे रेडकू जन्माला येणे ही घटना दुर्मिळ असल्याने. गेली दोन दिवस या रेडकाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती.

हे देखील वाचा