कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 नुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीची खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिल्या जाते.
महाराष्ट्र राज्यात राहणार्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भूमिहीन शेतमजूरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना 2021 राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पभूधारक शेतकरी २०२२ योजनेंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांच्या पती-पत्नीच्या नावे केली जाते. मात्र विधवा व परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात राज्य सरकार कडून देण्यात येते.
भूमीहीन योजना 2022 साठी अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. यासाठी शेतकऱयांनी संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात भेट द्यावी.
भूमिहीन योजना 2022 च्या अटी
- दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे निश्चित केले आहे.
- अर्जदारकडे जमीन नसावी तसेच तो दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
- परित्यक्ता, विधवा स्त्री यांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येईल.
- महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, त्या कुटुंबांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 चा लाभ घेता येणार नाही.
- यापूर्वी लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही. तसेच विकता येत नाही.
- लाभर्थ्याला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी असेल आणि त्याची मुदत ही 10 वर्षे असणार आहे.
- कर्जफेडीची सुरूवात ही कर्ज मंजुरीच्या दोन वर्षांनंतर सुरू होणार आहे.
- कुटूंबाने 10 वर्षाच्या आत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
- संबंधित लाभधारकाने जमीन स्वत: कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे.
- जमीन खरेदी करताना प्रती एकरी तीन लाख रूपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा पासफोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबत जातीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहीत प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक कार्ड प्रत, भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.
- मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांनी दिलेला)
- अर्जदारचा वय हे 60 वर्षाच्या खाली असेल तर त्याला वयाचा पुरावा द्यावा लागेल जसे की, शाळा सोडल्याचा दाखला, ज्यावर अर्जदारची जन्म तारीख स्पष्ट अक्षरात असावी.
- अर्जदार हा दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
- शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.
साभार – महाराष्ट्र शासन कृषी विभाग.