• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

लाख शेती : एक शास्वत रोजगारसंधी; वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

मनीषा येरखेडेbyमनीषा येरखेडे
in पीक व्यवस्थापन, Featured
February 24, 2022 | 10:59 am
lakh-farming

नैसर्गिक बदलामुळे शेतीचे स्वरूप बदलत आहे. अश्या परिस्थितीत शेतीमध्ये नाविन्यता आणणे ही काळाची गरज आहे. आज आपण अशाच एका नावीन्यपूर्ण शेतीबद्दल पाहणार आहोत ती म्हणजे लाख शेती.

प्राथमिक माहिती :-

  • महाराष्ट्र राज्यातील विदर्भात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने लाख शेती केली जाते.
  • लाख ही एक नैसर्गिक राळ आहे.
  • ती लाखेच्या कीटक मादीपासून प्रजननानंतर स्त्रावाच्या रुपात तयार होते.
  • लाख कीटकाच्या दोन जाती आहेत.
  • १) कुसामी
  • २) रंगिनी
  • प्रत्येक जातीपासून एका वर्षात दोन वेळा उत्पादन घेतले जाते.
  • भारतात ८० % उत्पादन रंगिनी किटकापासून घेतले जाते.
  • अधिक उत्पादन मिळविण्यासाठी लाख शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणे अत्यंत गरजेचे आहे.

लाख शेती सुरू करण्यासाठी खालील बाबीची आवश्यकता असते.

  • पळश, बोर इत्यादी पोषक वृक्ष
  • दावली
  • सिकेटर
  • प्लॅस्टिक सुतळी
  • लाख बीज
  • बांबू टोपली
  • कीटकनाशक
  • बुरशीनाशक

लाख कीटक संगोपन करण्याकरिता खालील वृक्ष असणे गरजेचे आहे.

  • पळस
  • बोर
  • पिंपळ
  • आकाशमनी

लाखेच्या कीटक संगोपन करण्याकरिता खालील बाबीचा अवलंब करणे बंधनकारक आहे.

  • झाडांची छाटणी करणे.
  • लाखेचे किडे सोडणे.
  • फुंकी काढणे.
  • कीटकनाशक / बुरशीनाशक फवारणी
  • लाखेच्या पिकाची कापणी
  • लाखेची छीलाई

झाडांची निवड आणि छाटणी :-

  • छाटणी केल्याने जुन्या व वाळलेल्या फांद्या काढल्या जाऊन नवीन न रसदार फांद्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.
  • नवीन फांद्यावर लाख किटकाचे चांगल्या प्रकारे संगोपन होऊन लाखेचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • पळस व बोरीची १० वर्षांवरील झाडे लाख शेतीसाठी योग्य आहेत. 
  • या झाडांवर लाख कीटक सोडण्यापूर्वी ६ महिने अगोदर या पोषक वृक्षांची छाटणी करावी.
  • कतकी हंगाम घेण्यासाठी पळस झाडाची फेब्रुवारी मध्य मध्ये छाटणी करावी.
  • वैशाखी हंगाम घेण्यासाठी पळस आणि बोर या झाडांची एप्रिल महिन्यात छाटणी करावी.

झाडाची छाटणी कशी करावी ?

  • छाटणी हलकी करावी.अंगठयापेक्षा मोठ्या फांद्या कापू नये.
  • सव्वा ते अडीच सेमी जाडीच्या वाळलेल्या, कीडग्रस्त आणि तुटलेल्या फांद्या एक ते दीड फूट लांबीवर कापून टाकाव्यात.
  • फांद्या कापण्याकरिता कोयता वापरावा.
  • फांद्या तिरप्या आणि एकाच दणक्यात कापाव्यात.

कीटक संचारण प्रक्रिया :-

  • लाख कीटकाच्या लहान पिल्लाना पोषक वृक्षाच्या फांद्यावर सोडणे यालाच कीटक संचारण म्हणतात.
  • या प्रक्रियेत लाख बीज म्हणजे लाख कीटकाच्या गर्भार मादी असलेल्या फांद्या एकत्रित करून त्या पोषक वृक्षांच्या फांद्यांवर बांधतात.
  • कीड संचारण करण्याकरिता झाडाचे वय १० वर्ष असणे गरजेचे आहे.

कीटक संचारण केव्हा करावे ?

  • हिवाळ्यात लाखेचा कीटकाच्या अंगावरील पापडीवर लाखेचे लहान पिल्ले पाहून
  • उन्हाळ्यात लाखेचे पिल्ले मादीच्या शरीरातून निघण्याचे एक आठवडा अगोदर

लाख कीटक झाडांवर कसे सोडावे ?

  • लाखबिजाच्या फांद्यावरील पाने व खराब काड्या काढून टाकाव्यात.
  • लाखबिजेच्या फांद्यावर शत्रू कीटक आढलळ्यास लागलीच फांद्या कीटकनाशक द्रावणात ८ ते १० मिनिटे बुडवून ठेवाव्यात.
  • ६० मेशची प्लॅस्टिक पिशवीमध्ये लाख बीज भरून झाडांवर बांधावे.
  • ६ इंच लांबीच्या ४ फांद्या घेवून एक गठ्ठा बनवावा.
  • गठ्ठा बांधताना सुतळी चे दोन्ही टोक लांब ठेवावेत. त्यांचा उपयोग झाडांवर बांधताना करावा.
  • लाखबीज गठ्ठा झाडांच्या फांदीला समांतर फिट बांधावा.
  • लाखबीजेचे गठ्ठे झाडांच्या सर्व फांद्यावर बऱ्याच ठिकाणी बांधाव्या.
  • वैशाखी आणि कटकी पीक घेतल्यास एक मीटर फांदी करिता ५ ते १० ग्रॅम बीज वापरावे.
  • मोठ्या झाडांवर ३०० ते ४०० ग्रॅम बीज वापरावे.
  • वैशाखी पिकाकरीता प्रती मीटर फांदी २०० ग्रॅम बीज आणि मोठ्या झाडाकरिता १ किलो पर्यंत लाखबीज वापरावे.

फुंकी उतरविणे :-

  • लाख बीजेच्या काड्यातून लहान लहान पिल्ले निघाल्यावर राहिलेल्या लाखेच्या काड्याना फुंकी म्हणतात.

फुंकी का काढावी :-

  • शत्रू कीटकांना लाखेच्या नवीन पिकावर जाण्यापासून रोखण्याकरीता
  • वाळल्यानंतर लाख जमिनीवर पडू नये म्हणून

फुंकी केव्हा काढावी ?

  • लाख बीजेच्या गठठ्यातून लाख कीटक निघणे संपल्यावर किंवा कीटक सोडल्यावर तीन आठवडाच्या आत फुंकी लाख झाडावरून काढून घ्यावी.

फुंकी कशी काढावी ?

  • बांबूला धारदार हूक किंवा विळा बांधून त्याद्वारे लाख बीजेच्या गठ्याची दोरी कापून टाकाव्यात.

कीटकनाशक फवारणी :-

  • लाख कीटक सोडल्यावर १ महिन्याने लाखेच्या फांद्यावर शिफारस केलेली कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांची फवारणी करून घ्यावी.

लाख पिकाची कापणी :-

  • पोषक झाडावरील अपरिपक्व लाख कापणी एप्रिल महिन्यात शेवटी करावी.
  • परिपक्व झालेल्या रंगिनी लाखाची कतकी पिकाची कापणी ऑक्टोंबर, नोव्हेंबर तर बैसाखी पिकाची कापणी जून जुलै महिन्यात करावी.
  • कापणी करताना छाटणी सुद्धा करावी.

पोषक झाडांची विभागणी :-

  • लाख शेती करताना पोषक झाडे विभागून लाख शेती करणे बंधनकारक आहे.

पोषक झाडांची विभागणी का करावी ?

  • झाडांना आराम मिळाल्याने त्यांची पोषण क्षमता वाढते.
  • जास्त प्रमाणात लांब फांद्या मिळाल्याने झाडाचा आकार वाढतो.
  • उत्पादनात वाढ दिसून येते.बीज लाखेची कमतरता भासत नाही.
  • शत्रू किटकाचा कमी त्रास होतो.उत्पादनात आणि उत्पन्नात सातत्य राहते.

झाडांची विभागणी कशी करावी ?

  • पळसाची झाडे सारख्या दोन भागात विभागून घेण्यात यावे. आणि तिसरा भाग बोरीचा झाडाचा ठेवावा.
  • लाख कीटक पोषक वृक्षावर सोडण्याचा सहा महिने अगोदर बोरीच्या सर्व झाडांची आणि पळसाच्या झाडांच्या एका भागाची कापणी एप्रिल महिन्यात करावी.
  • ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही विभागात लाखेचे कीटक सोडावेत.
  • पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बोरावरील अपरिपक्व लाख कापून घ्यावी आणि पळसाच्या झाडांच्या दुसऱ्या भागातील झाडाच्या फांद्यांची कापणी करावी.
  • पळसावर लाखेचे कीटक जून व जुलै महिन्यात सोडण्याकरिता सोडावीत. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पूर्ण पिकाची कापणी करावीत.
  • मिळालेल्या लाखेच्या बिजापासून बोर आणि पळसाच्या दुसऱ्या भागातील लाखेचे कीटक सोडावेत.
  • पिकाची कापणी केल्यावर पळसाच्या काही फांद्यावर काही लाख असल्यास ती तशीच राहू द्यावी.
  • पुढील वर्षी एप्रिल मध्ये कापणीच्या वेळेस अपरिपक्व लाख कापावी अश्याप्रकारे पळसाच्या झाडाची दोन भागात विभागणी करून बैसाखी आणि कतकी पीक घेता येते.
  • बोरीच्या झाडावरील बैसाखी पिकाची अपरिपक्व लाख दरवर्षी घेणे शक्य आहे. 
  • जर शेतकरी फक्त पळसावर लाख शेती करणार असेल तर त्यांची तीन भागात विभागणी करावी.

लाख किटकाची बीजाई कुठे मिळते ?

  • बैसाखी लाखेची बिजाई ऑक्टोबर महिन्यात आणि कतकी बिजाई जुलै महिन्यात लाख शेती करणाऱ्या भागात सहज मिळते.
  • भारतीय लाख संशोधन संस्था, नामकुम, रांची, झारखंड येथे संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.

  • भारतीय लाख संशोधन संस्था, नामकुम, रांची, झारखंड
  • आत्मा प्रकल्प अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय
  • तालुका कृषी अधिकारी कार्यालय
  • कृषी विज्ञान केंद्र

लाख शेतीचे बारमाही कॅलेंडर :-

  • जानेवारी : – पोषक झाडावरील वाळवी / उधळीचा नाश करावा.
  • फेब्रुवारी : – पहिल्या आठवड्यात नर किडे निघण्या अगोदर शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
  • मार्च :- बैसाखी अरी पीक पाहणी
  • एप्रिल :- झाड छाटणी, अरी लाख खंडातून लाखेचे कापणी आणि झाडाची छाटणी करून लाखेची छिलई करणे.लाख विक्री करणे.
  • मे :- बैसाखी लाख बीज खंडातून कीटक निघण्याचा अंदाज घ्यावा.
  • जून :- लाखबीज खंडात बैसाखी पिकाला आत्मसंचारण साठी सोडावे.
  • जुलै :- आवश्यकतेपेक्षा जास्त लाख कापून विक्री करावी.
  • ऑगस्ट :- कीटकनाशक पहिली फवारणी
  • सप्टेंबर :- आवश्यकता असल्यास कीटकनाशक दुसरी फवारणी करावी.लाखबीज खंडातून कीटक निघण्याचा अंदाज घ्यावा. अरी मध्ये लाखबीज गरज आहे का याची चाचपणी करणे.
  • ऑक्टोंबर :- लाखेचे लहान कीटक बाहेर पाडून लाख बीजाची कापणी करावी.लाखबीजातील कीटक दोन्ही खंडात सोडावे.
  • नोव्हेंबर :- फुंकी काढावी व छीलावी.परोपजिवी व परभक्षी किडीचा संख्येच्या अंदाज घ्यावा.कीटकनाशक फवारणी करावी.
  • डिसेंबर :- गरज पडल्यास दुसरी कीटकनाशक फवारणी करावी.

विशेष बाब :-

  • लाख शेती हा प्रयोग मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळी भागासाठी वरदान ठरू शकतो.
  • लाख शेती करण्याकरिता आत्मा प्रकल्प अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय हे सर्व सहकार्य करतात.
  • उत्तम नियोजन आणि तज्ञ मंडळीच्या मार्गदर्शनात हा व्यवसाय केल्यास एक शास्वत उत्पन्न देणारा स्त्रोत शेतकरी बंधू भगिनींना तयार होईल हे नक्की !

माहिती स्त्रोत :-डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

हे देखील वाचा :

  • थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?
  • सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर
  • रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?
  • नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा
  • मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन
Tags: Lakh Farmingलाख शेती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
pista

पिस्ता सांगून विकले शेंगदाणे

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट